esakal | जिमी शेरगीलला 'चूना', 'यामुळे' थांबवलं वेबसीरिजचं शुटिंग
sakal

बोलून बातमी शोधा

actor Jimi shergil

जिमी शेरगीलला 'चूना', यामुळे थांबवलं वेबसीरिजचं शुटिंग

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोना (corona) अद्याप संपलेला नाही. याचा प्रत्यय अद्याप मनोरंजन क्षेत्रातील काही घडामोडींवरुन येताना दिसतो आहे. बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता जिमी शेरगील (bollywood jimi shergil) हा त्याच्या वेगळ्या प्रकारच्या भूमिकांसाठी ओळखला जातो. त्याचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. सध्या तो चर्चेत आला आहे त्याच्या चूना नावाच्या वेबसिरिजमुळे. त्याच्या या मालिकेचे चित्रिकरण सुरु होते. मात्र आता ते थांबवावे लागले आहे. त्याला कारण म्हणजे कोरोना. कोरोनाच्या प्रभावामुळे त्या मालिकेच्या काही सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. (jimmy shergill web series chuna shotting stopped in lucknow due to 5 actors corona positive yst88)

चूना (chuna web serise) या वेबसिरिजमधील पाच कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या युनिटमधील 92 लोकांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी पाच जणांना कोरोना झाल्याची बाब समोर आली. त्यानंतर तातडीनं चित्रिकरण थांबविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी त्या मालिकेचे चित्रिकरण थांबवावे अशा सुचना दिल्या आहेत. अभिनेता नमित दास, मोनिका पवार हे या मालिकेत दिसणार आहेत. उत्तरप्रदेशातील लखनौ शहरात या मालिकेचे चित्रिकरण सुरु होते.

अशी चर्चा आहे की, सुरुवातीला त्या युनिटमधील 92 लोकांना कोरोना झाल्याची बातमी जिल्हाधिकाऱ्य़ांना मिळाली. त्यांनी त्या सर्व लोकांना तपासणीचे आदेश दिले. त्यावर त्यांना त्यातील पाच व्यक्तींना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. या मालिकेची शुटिंग मलिहाबादस्थित मिर्झागंज भागात सुरु होती. तिथल्या वेगवेगळ्या हॉटेलमध्ये मालिकेच्या चार ते पाच टीम राहत आहेत.

हेही वाचा: पॅरिसमधल्या रस्त्यावर 'प्रियाचा जलवा', नेटकऱ्यांकडून 'लाईक्सचा पाऊस'

हेही वाचा: 'येऊ कशी..'मधील 'मोमो'च्या भूमिकेतून बाहेर येणं अवघड- मीरा जगन्नाथ

चूना ही मालिका समाजातील अशा लोकांची कथा सांगते जे लोक राजकारणावर अवलंबून आहेत. त्यांना त्यापासून परावृत्त व्हा. असे कितीही सांगितले तरी ते त्यापासून हटण्याचे नाव घेत नाही. याशिवाय समाजातील विसंगतीवर प्रकाश टाकण्याचे काम यानिमित्तानं करण्यात आले आहे.

loading image