1984 मधील मिस.युनिव्हर्स स्पर्धेतला जुहीचा जुना व्हिडीओ व्हायरल..'लोक म्हणू लागले,'ही तर एकदम..'Juhi Chawla Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Juhi Chawla Old Video Viral

Juhi Chawla:1984 मधील मिस.युनिव्हर्स स्पर्धेतला जुहीचा जुना व्हिडीओ व्हायरल..'लोक म्हणू लागले,'ही तर एकदम..'

Juhi Chawla: जुही चावला १९८४ मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकलीआहे. आता ही गोष्ट सर्वप्रचलित आहे. त्यावेळी ती फक्त १८ वर्षांची होती. त्याच वर्षी ती भारतातर्फे मिस युनिव्हर्स स्पर्धेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी गेली होती.

अनेक वर्षांनी आता जुही चावलाचा मिस.युनिव्हर्स स्पर्धेतला तो व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत स्पर्धेतला तिचा नॅशनल कॉश्युम राऊंड दिसत आहे. जुही यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. ती त्या राऊंडची विजेती देखील ठरली होती.

व्हिडीओ पाहून लोक जुहीची प्रशंसा करताना दिसत आहेत. तर कुणा एका चाहत्यानं जुही आजच्या काळातील एका बॉलीवूड अभिनेत्रीसारखी दिसते असं म्हटलं आहे. (Juhi chawla miss universe old video viral, fans comment)

व्हिडीओमध्ये जुहीनं निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. ती खूपच तरुण दिसत आहे. ती स्टेजवर आहे आणि तिच्यासोबत इतर देशातल्या स्पर्धक देखील दिसत आहेत. व्हिडीओमध्ये नॅशनल कॉश्युम राऊंड दरम्यान जुही आपलं इंट्रोडक्शन करताना दिसत आहे.

ती बोलत आहे,नमस्ते..मै बॉम्बे..भारतातून जुही चावला आहे. तिनं गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केलेला आहे. ट्रेडिशनल ज्वेलरी आणि पारंपरिक केशरचना करुन ती एकदम भारतीय सौंदर्यवतीच्या रुपात शोभून दिसत आहे. जुही चावला त्यावेळी भले मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकली नसेल पण तिन त्यावेळी नॅशनल कॉश्युम राऊंड जिंकला होता.

हेही वाचा: परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

व्हीडिओ पाहून एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,जुही एकदम कियारा सारखी दिसतेय. तर दुसऱ्या एकानं लिहिलं आहे,जेव्हा अंगप्रदर्शन गरजेचं नव्हतं. तर एकानं चक्क लिहिलं आहे,त्या काळात स्त्रिया अधिक सुंदर दिसायच्या. त्यावेळी मिस इंडिया..मिस युनिव्हर्स सारख्या स्पर्धांचा फोकस सेक्सी आणि हॉट दिसण्यावर नसायचा. आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की ती तशी नाही किंचाळली जशी आजकाल किंचाळते..तो काळ खूपच ग्रेसफुल होता.