Juhi Chawla : 'तू काही माधूरी दीक्षित नाही, तेव्हा तुला....' दिग्दर्शक धर्मेश यांनी सांगितला तो किस्सा, काय घडलं होतं?

आता एका मुलाखतीमधून राजा हिंदूस्थानी या चित्रपटाच्यावेळचा तो किस्सा समोर आला आहे.
Juhi Chawla turned down Raja Hindustani
Juhi Chawla turned down Raja Hindustani esakal

Juhi Chawla turned down Raja Hindustani : बॉलीवूडमध्ये ९० च्या दशकांत ज्या अभिनेत्रींनी वेगळी ओळख चाहत्यांच्या मनात तयार केली त्यात माधुरी दीक्षित आणि जुही चावलाचे नाव घ्यावे लागेल. या दोन्ही अभिनेत्रींनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. माधुरीचा डान्स, अभिनय याची भुरळ अजूनही प्रेक्षकांना त्या काळाची आठवण करुन देते.

आता जुही चावलानं एका मुलाखतीमधून राजा हिंदूस्थानी या चित्रपटाच्यावेळचा तो किस्सा समोर आला आहे. त्यामुळे जुही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर देखील त्यारुन वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून जुही चावला ही वेगवेगळ्या कारणांमुळे बातमीचा विषय आहे. तिनं मुंबईमध्ये मोबाईल टॉवरमुळे पक्षांना होणाऱ्या त्रासाविषयी न्यायालयात धाव घेतली होती.

Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

जुहीनं त्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, तिला राजा हिंदूस्थानीमध्ये प्रमुख भूमिका मिळणार होती. मात्र ती मिळाली नाही. त्यातून जुही नाराज झाली होती. प्रसिद्ध फिल्ममेकर धर्मेश दर्शन यांनी जुहीची तुलना त्यावेळी माधुरी दीक्षित सोबत केली होती. त्यामुळे जुही चर्चेतही आली होती. आता तिनं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. धर्मेश यांनी देखील आपण जुहीची तुलना माधुरी सोबत करुन तिच्या भावना दुखावल्या होत्या. जुहीला त्याचे वाईट वाटले होते.

राजा हिंदुस्थानीमध्ये धर्मेश यांना जुही प्रमुख अभिनेत्री म्हणून हवी होती. मात्र ते शक्य झाले नाही. त्यावेळी त्यांनी करिश्मा कपूरशी संपर्क साधला. जुहीनं धर्मेश यांची ती ऑफर नाकारली होती. त्यामुळे त्यांना करिश्माकडे जावे लागले होते. लहरे रेट्रोमध्ये आलेल्या एका मुलाखतीमध्ये दर्शन यांनी त्यावेळचा किस्सा सांगितला असून त्याची चर्चा होत आहे. यापूर्वी धर्मेश यांनी लुटेरेमध्ये जुहीसोबत काम केले होते.

धर्मेश म्हणाले, जुहीला लुटेरे सारख्या आणखी एका चित्रपटामध्ये काम करायचे होते. त्यानंतर मी तिला राजा हिंदूस्थानीची कथा ऐकवली. आणि तिला त्या चित्रपटात येण्यासाठी विनंतीही केली होती. मात्र तिनं त्याला नकार दिला. हीच गोष्ट हम आपके है कौनच्या वेळी देखील झाली होती. तिनं मला सांगितले होते की, तुम्ही काही सुरज बडजात्या नाही असे म्हटले होते. त्यामुळे मग मी नंतर तिला म्हणालो की, तू पण काही माधुरी दीक्षित नाहीस. त्या गोष्टीमुळे आमच्यात विसंवाद सुरु झाल्याचे धर्मेश यांनी यावेळी सांगितले.

पुढच्या दिवशी जुहीला काय वाटले माहिती नाही. तिनं माफी मागितली. ते प्रकरण तिकडेच मिटले. त्यानंतर मला वाटले पुन्हा एकदा जुहीला राजा हिंदूस्थानीसाठी विचारावे पण तेव्हाही तिचा नकार कायम होता. खरं तर तेव्हा पूजा भट्ट, ऐश्वर्या राय या अभिनेत्रींना देखील विचारणा केली होती.

Juhi Chawla turned down Raja Hindustani
Ganapath Movie Review : टायगरच्या माकडउड्यांचा 'फुसका गणपत', आजारी पडलेली कथा अन् बरचं काही!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com