esakal | Coronavirus : चित्रीकरण बंद झाल्यामुळे ज्युनियर आर्टिस्ट आणि कामगारांना आर्थिक फटका
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus : चित्रीकरण बंद झाल्यामुळे ज्युनियर आर्टिस्ट आणि कामगारांना आर्थिक फटका

चित्रीकरण बंद झाल्यामुळे ज्युनियर आर्टिस्ट तसेच मेकअपमन, हेअर ड्रेसर, स्पाॅटबाॅय, लाईटमन यांच्यासह अन्य कामगारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Coronavirus : चित्रीकरण बंद झाल्यामुळे ज्युनियर आर्टिस्ट आणि कामगारांना आर्थिक फटका

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे -सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - कोरोना विषाणूच्या आक्रमणामुळे पुढील वीस-पंचवीस दिवस संपूर्ण चित्रीकरण बंद राहणार असल्यामुळे ज्युनियर आर्टिस्ट तसेच पडद्यामागे काम करणारे अन्य कामगार यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. कुणाच्या घरी आईच्या औषधोपचारासाठी पैसे नाहीत तर कुणाला आता घर कसे चालवायचे याची चिंता लागली आहे. हातावर पोट असणाऱ्या या मंडळींना आता आर्थिक मदत किंवा जीवनावश्यक वस्तूंची तातडीची गरज आहे. एका ज्युनियर आर्टिस्टचा पती गेली तीनेक वर्षे अर्धांग वायूच्या झटक्यामुळे घरीच आहे. त्याच्या उपचारासाठी काय करायचे असा प्रश्न सतावीत आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या सगळीकडचे चित्रीकरण बंद झाल्यामुळे ज्युनियर आर्टिस्ट तसेच मेकअपमन, हेअर ड्रेसर, स्पाॅटबाॅय, लाईटमन यांच्यासह अन्य कामगारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या कामगारांना कधी पाचशे तर कधी हजार व बाराशे रुपये चित्रीकरण सुरू असले की दररोज मिळत असतात. दररोज मिळणाऱ्या या पैशांवरच त्यांच्या कुटुंबीयांचा घरखर्च चालत असतो. त्याकरिता त्यांना बारा ते सोळा तास काम करावे लागते आणि त्यातून मिळणारी ही रक्कम तुटपुंजी असते. हे कामगार कोणतीही तक्रार न करता काम करीत असतात कारण संपूर्ण कुटुंबाचा डोलारा त्यांच्या खांद्यावर असतो. आता चित्रीकरणच बंद असल्यामुळे त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. याबाबत ज्युनियर आर्टिस्ट संपदा गावणंग म्हणाली, की गेले दीड महिना माझ्याकडे काम नाही आणि आता तर कोरोनामुळे माझ्यावर आभाळच कोसळले आहे. माझ्या पतीला अर्धांग वायू झाल्यामुळे ते तीनेक वर्षे घरीच असतात. त्यांच्या औषधोपचाराचा खर्च तसेच आई आणि दोन मुले यांचा सांभाळ मला करावा लागतो. आम्हाला दिवसाला चारशे ते पाचशे रुपये मिळतात आणि त्यावरच संपूर्ण घरचा  खर्च अवलंबून असतो. आता चित्रीकरण बंद झाल्यामुळे करायचे काय हा प्रश्न आहे. 

ऋषी कपूर यांनी राज्य सरकारला केलेल्या मागणीवरून सोशल मिडियावर झाले ट्रोल

अशोक कुंभार आणि त्यांचा भाऊ सचिन कुंभार दोघेही मराठी व हिंदी इंडस्ट्रीत मेकअपमन म्हणून काम करतात. त्यांची परिस्थितीही हलाखीची झाली आहे. 

अशोक कुंभार म्हणाले, की माझे आताच लग्न झाले आहे. संपूर्ण कुटुंब आम्हा दोघा भावांवर अवलंबून आहे. आमच्या आईचा उपचाराचाही खर्च आहे. चित्रीकरण कधी सुरू होतेय याची वाट पाहात आहे. कारण आता पैसेच संपलेले आहेत. आर्थिक ओढाताण करावी लागत आहे.

coronavirus: पडद्यामागच्या कामगारांना मराठी कलाकारांचा मदतीचा हात

मेकअपमन प्रकाश शेलार म्हणाले, की काम केलेल्याचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत आणि आता हा बंद त्यामुळे सगळे आर्थिक गणित कोसळले आहे . 

गेली वीसेक वर्षे आर्टिस्ट म्हणून काम करणारे राजेंद्र जाधव म्हणाले, की संपूर्ण घर माझ्यावर अवलंबून असते. पत्नी, दोन मुले आणि आई असे माझे कुटुंब. आईच्या आजारपणाचा खर्च खूप आहे. आता या बंदमुळे काय करावे...औषधासाठी कुठून पैसे आणावे असा प्रश्न मनात उभा राहिला आहे.

loading image