जस्टिन बीबर पाच वर्षांनंतर भारतात करणार परफॉर्म; या तारखेला होणार शो

प्रसिद्ध कॅनेडियन पॉप स्टार जस्टिन बीबर (Justin Bieber) या वर्षी 18 ऑक्टोबर रोजी दिल्लीत परफॉर्म करणार आहे.
Justin Bieber
Justin BieberSakal

प्रसिद्ध कॅनेडियन पॉप स्टार जस्टिन बीबर (Justin Bieber) या वर्षी 18 ऑक्टोबर रोजी दिल्लीत परफॉर्म करणार आहे. जस्टिन सध्या वर्ल्ड टूरवर (World Tour) गेला आहे. यादरम्यान त्याचा भारतातही एक शो होणार आहे. चाहते त्याच्या शोची तिकिटे ऑनलाइन खरेदी करू शकतील. याआधी जस्टिनने 2017 मध्ये भारतात परफॉर्म केलं होतं. या कॉन्सर्टमध्ये लिपसिंक केल्याचा आरोपही तिच्यावर झाला होता. 18 जून रोजी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर त्याचा हा कॉन्सर्ट होणार आहे. (Justin Bieber to perform in Delhi in October)

Justin Bieber
बॉलीवूड अभिनेत्रीसोबतचं डेटिंग अन् धोका; कार्तिक आर्यननं अखेर केलं मान्य

बीबर 30 मिनिटे करणार परफॉर्म-

वर्ल्ड टूरवर असलेला पॉप सिंगर जस्टिन भारतासह इतर अनेक देशांमध्ये शो करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो 30 देशांमध्ये 125 हून अधिक शो करणार आहे. त्याचा हा दौरा मे 2022 ते मार्च 2023 दरम्यान पूर्ण होईल. दरम्यान 18 जून रोजी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर त्याचा हा कॉन्सर्ट होणार आहे. तिथे तो सुमारे ३० मिनिटे परफॉर्मन्स करणार आहे. याआधी 2016-17 मध्ये जस्टिन वर्ल्ड टूरवर गेला होता.

Justin Bieber
'आश्रम' च्या सेटवर प्रकाश झा यांच्यावर हल्ला; म्हणाले,'तब्बल एक तास...'

यापूर्वीच्या कॉन्सर्टमध्ये झाला होता वाद-

2017 मध्ये जस्टिन बीबर भारतात आला तेव्हा तो वादात सापडला होता. त्यावेळी बीबरच्या शोची तिकिटे खूप महाग होती. त्यानंतरही सुमारे ४० हजार लोकांनी कॉन्सर्टची तिकिटे खरेदी केली होती. परंतु बीबरने स्टेजवर गाणं गायलंच नाही, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. त्यानं केवळ लिप सिंक केलं होतं, असा आरोप त्याच्यावर झाला होता. त्यानंतर लोकांनी त्याला खूप ट्रोल केले. त्यानंतर तो तात्काळ भारत सोडून परतला. या कॉन्सर्टमध्ये अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये बीबरचा कॉन्सर्ट झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com