Bhuvan Badaykar: एके काळी कच्चा बदाम म्हणत दारोदारी फिरणारा भुवन म्हणतोय,'आता मला शेंगदाणे विकायला..' Kacha Badam fame | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kacha Badam fame bhuvan badaykar is now coming back with new album

Bhuvan Badaykar: एके काळी कच्चा बदाम म्हणत दारोदारी फिरणारा भुवन म्हणतोय,'आता मला शेंगदाणे विकायला..'

Bhuvan Badaykar:'कच्चा बदाम' म्हणत रातोरात स्टार झालेला भुवन बादायकर तर आपल्या सगळ्यांच्याच लक्षात असेल,ज्याच्यामुळेच अंजली अरोरा देखील प्रसिद्ध झाली होती. कारण भुवनच्या गाण्यानेच अंजलीला पॉप्युलर केलं होतं. असो, आता भुवनच्या बाबतीत नवी बातमी कानावर पडतेय की , त्याचा एक नवा अल्बम घेऊन तो दमदार कमबॅक करत आहे. तो आता काही हटके गाणी बनवून लोकांचे मनोरंजन करण्याच्या तयारीत आहे. त्याने एका मुलाखतीत त्याच्या नव्या गाण्याविषयी माहिती दिली आहे. त्याच मुलाखतीत भुवनने आता आपण शेंगदाणे विकणार नाही हे स्पष्ट केलं आहे.(Kacha Badam fame bhuvan badaykar is now coming back with new album)

हेही वाचा: India Lockdown: सिनेमाच्या पोस्टरवरील सईच्या लूकवरनं भडकलं पब्लिक; म्हणाले, 'नेहमीच मराठी कलाकार..'

भुवन बादायकरला त्याच्या विशिष्ट प्रकारे शेंगदाणे विकण्याच्या स्टाईलनं खरंतर प्रसिद्ध केलं होतं. एका छोट्याशा व्यवसायाने त्याला कुठल्या कुठे पोहोचवलं हे वेगळं सांगायला नकोच आपल्याला. मे मध्ये झालेल्या त्याच्या कार अपघातानंतर भुवन गायब झाला होता. आता तो यातनं बरा झालाय आणि सध्या नवीन अल्बमच्या रिलीजच्या तयारीत आहे. भुवनने सांगितल्याप्रमाणे त्याच्या अल्बममध्ये तीन गाणी असणार आहेत,जी त्याच्या जीवनसंघर्षावर आधारित असणार आहेत.

हेही वाचा: Salman Khan:'सलमानहून मोठी असले म्हणून काय झालं,मलाही त्याच्यासोबत..',नीना गुप्तांच्या वक्तव्यानं खळबळ

मुलाखतीत भुवन म्हणाला,''आता मी शेंगदाणे विकणार नाही...हे माझ्या अल्बमचं नाव आहे आणि यात मी कसा प्रसिद्ध झालो याची कहाणी मांडण्यात आली आहे. तो म्हणाला,असं नाही की मला आता शेंगदाणे विकायचे नाहीत,पण यासाठी माझ्याकडे आता वेळ नाही.आता मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीनं जगायचं आहे''.

भुवन पुढे म्हणाला, ''माझ्याकडे आता गाडी आहे स्वतःची. ज्यानं मी घेरलेला असतो. हेच माझ्या आयुष्याचं आताचं सत्य आहे आणि तेच मला माझ्या नव्या गाण्याच्या माध्यमातून मांडायचे आहे. मी स्वतःला भाग्यशाली समजतो की आता लोकांना माझी गाणी ऐकायची आहेत. माझ्या व्हायरल व्हिडीओची ही कमाल आहे. अनेकांना आता माझ्यासोबत काम करायचे आहे''.

हेही वाचा: Pathan Teaser: 'पठाण' च्या टीझरमध्ये खंडीभर चूका, शाहरुखची खिल्ली उडवत लोक म्हणाले...

माहितीसाठी इथं नमुद करतो की भुवन आता 'जात्रा' नावाच्या एका थिएटर ग्रुपशी जोडलेला आहे. त्यांच्यासोबतच तो काम देखील करत आहे. बंगालमध्ये अनेक ठिकाणी त्याने दौरे केलेयत आणि करत आहे. नवरात्री उत्सवादरम्यान त्यानं आपल्या या नव्या अल्बममधील गाण्यांवरचं काम पूर्ण केलं आहे. आता तो या अल्बमच्या रिलीजची वाट पाहत आहे.