काजल अग्रवालने पहिल्यांदाच दाखवला ‘नील’चा चेहरा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kajal Aggarwal

काजल अग्रवालने पहिल्यांदाच दाखवला ‘नील’चा चेहरा...

चित्रपटसृष्टीतील बऱ्याच अभिनेत्री आपल्या अभिनयाबरोबरच मातृत्वाची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडत आहे. प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मा, सोनम कपूर आणि त्यातीलच एक म्हणजे काजल अग्रवाल. काजलही सध्या तिचा मूलगा नील याच्यासोबत वेळ घालवत आहे. काजल नीलसोबतचे अनेक फोटो सोशल मिडियावर पोस्ट करत असते पण त्यात नीलचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता.आज तिने नीलचा चेहरा दाखविला आहे.

आज काजल मुलगा आणि नवऱ्यासोबत दिसली. ती मुंबई विमानतळावर क्लिक झाली. तिने तिच्या मुलासोबत कॅमेऱ्यांसाठी पोज दिली आणि पहिल्यांदाच तिने नीलचा पूर्ण चेहरा उघड केला. नील खूपच क्यूट दिसतोय तो स्ट्रोलरमध्ये आराम करत होता. काजल एथनिक लूक मध्ये तर गौतम कॅज्युअलमध्ये दिसले. काजलने पापाराझींसमोर पहिल्यांदाच तिच्या मुलाचा चेहरा दाखविला. एवढंच नाही तर तिने मुलगा आणि नवरा गौतमसोबत फोटोही काढले.

हेही वाचा: Bollywood: ‘गुडबाय’ चित्रपटाने का मानले क्रिती सेननचे विशेष आभार ?

काजलने 19 एप्रिल 2022 रोजी गोंडस नीलला जन्म दिला.काजल सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे, तिच्या मुलाचे फोटो ती शेअर करत असते आणि तिचे चाहतेही तिच्या फोटोंना भरभरुन प्रतिक्रिया देतात. काजल लवकरच ‘इंडियन 2' या चित्रपटातून पडद्यावर परत येणार आहे. या चित्रपटात ती कमल हसन आणि रकुल प्रीत सिंह यांच्यासोबत दिसेल. इंडियन 2' हा 1994 मध्ये आलेल्या सुपर फिल्म 'इंडियन'चा दुसरा भाग आहे.