Bollywood: ‘गुडबाय’ चित्रपटाने का मानले क्रिती सेननचे विशेष आभार ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood News
Kriti sanon 
Rashmika Mandanna

Bollywood: ‘गुडबाय’ चित्रपटाने का मानले क्रिती सेननचे विशेष आभार ?

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने ‘गुडबाय’या चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये एंट्री केली.यात अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहे.हा फॅमिली ड्रामा असून 7 ऑक्टोबर चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय.या चित्रपटात अमिताभ बच्चन सर्वसाधारण वडिलाच्या भूमिकेत दिसताय, तर रश्मिका मंदान्नाने त्यांच्या मुलीची भूमिका साकारतेय.मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रश्मिका नव्हे तर दुसरीच अभिनेत्री चर्चेत आहे. ती म्हणजे क्रिती सेनन...

हेही वाचा: २५ तासांची तयारी नंतर अमिताभ बच्चन यांनी 'गुडबाय'चे केले हटके प्रमोशन

चित्रपटाच्या opening slate मध्ये दिग्दर्शक  विकास बहल यांनी 'स्पेशल थँक्स' श्रेणी [‘Special Thanks’ category]अंतर्गत क्रिती सेनन हिच्या नावाचा उल्लेख आहे. क्रितीचे नाव पाहिल्यानतंर प्रेक्षकांनी भुवया उंचावल्या. त्यामूळे क्रितीचं आणि  रश्मिकाचं काय कनेक्शन असा प्रश्न अनेकांना पडला. या प्रश्नाचं उत्तर दिग्दर्शक विकास बहल यांनीच दिलयं. चित्रपटाच्या नावामध्ये क्रितीचं योगदान आहे.ते झालं असं की...

क्रितीला विकास बहल हा चित्रपट बनवत आहे हे ठाऊक होते. क्रितीने याबाबत बहल यांना फोन करून विचारणा केली आणि गप्पा मारताना तिनं या चित्रपटाच शीर्षक त्यांना सुचवलं.विशेष म्हणजे बहल यांच्या बहूतांश चित्रपटाचे टायटल हे इंग्लिशमध्ये आहे.त्यामूळे त्यांना 'गुडबाय' हे इंग्लिश टायटल आवडलेही. त्यांनी काही दिग्गज व्यक्तीशी याबाबत चर्चा केली आणि चित्रपटाचे हे शीर्षक अगदी पाच मिनिटांत फायनल केले. त्यामुळे चित्रपटाच्या टायटल म्हणजेच 'गुडबाय'मध्ये क्रितीचं योगदान आहे म्हणून विकास बहल यांनी क्रितीला 'स्पेशल थँक्स' केलयं.

हेही वाचा: Bollywood actresses: या फिट अभिनेत्रींचा work out लुक एकदा पहाच...

‘गुडबाय’ हा चित्रपट बालाजी मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांनी एकत्रितपणे निर्मित केला आहे. अमिताभ बच्चन यांनी हरीश भल्ला या वृद्ध व्यक्तीची तर रश्मिका मंदान्नाही तारा भल्ला त्यांच्या मुलीच्या भूमिकेत दिसतेय.