अगं बाई, चक्क काजोलसोबत पाकिस्तानी अलीचा फ्रेंच किस! अभिनेत्यानं तर...| Kajol | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kajol

Kajol : अगं बाई, चक्क काजोलसोबत पाकिस्तानी अलीचा फ्रेंच किस! अभिनेत्यानं तर...

Kajol bollywood actress Pakistani Actor Alyy Khan Kiss scene : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल ही तिच्या हटके स्टाईल आणि अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. तिचा बोल्डनेस हा तिच्या चाहत्यांसाठी खास चर्चेचा विषय असतो. आता काजल एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. त्यावरुन तिच्यावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ काजलनं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. ४८ वर्षांची काजल ही द गुड वाईफच्या रिमेकमध्ये आता चाहत्यांना दिसणार आहे. सध्या या मालिकेची मोठ्या प्रमाणावर चर्चा असून त्यामध्ये पाकिस्तानी कलाकार अली खान देखील दिसणार आहे. अलीनं त्याच्या एका मुलाखतीमध्ये काजोलविषयीच्या क्रशबाबत उल्लेख केला होता.

Also Read - भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

पाकिस्तानी कलाकार अलीनं नादीर अलीच्या पॉडकास्टमध्ये काजोलसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. तो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. नादीरनं जेव्हा त्याला तुझी आवडती अभिनेत्री कोणती असं विचारलं तेव्हा त्यानं काजोलचे नाव घेतले. मी त्यांच्यासोबत एका सीरिजमध्ये देखील काम केले आहे. तो एक आनंददायी अनुभव होता.

यावेळी अलीनं काजोलसोबत किसचा तो प्रसंगही सांगितला. आम्ही ज्या मालिकेमध्ये काम केले त्यामध्ये एक किसिंगचा प्रसंग होता. तो आम्ही केला. मी त्यांचा बॉस आणि बॉयफ्रेंडची भूमिका करतो आहे. ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. ही सीरिज अजय देवगण यांच्या प्रॉडक्शन हाऊसतर्फे होत आहे. मात्र ज्यादिवशी किस सीनची शुटिंग होती तेव्हा ते सेटवर आले नव्हते.

काजलनं देखील तो सीन देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे आढेवेढे घेतले नाही. द गुड वाईफ ही मुळ मालिका ज्युलियाना मार्गुलीज यांची असून २००९ ते २०१६ दरम्यान या मालिकेचे ७ सीझन आतापर्यत प्रदर्शित झाले आहेत.