ग्रीसमध्ये पार्टीत रमलेल्या न्यासावर काजोलचं मोठं वक्तव्य, म्हणाली... Kajol | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kajol Speaks about her daughter Nyasa Devgan's Life important decision

ग्रीसमध्ये पार्टीत रमलेल्या न्यासावर काजोलचं मोठं वक्तव्य, म्हणाली...

न्यासा देवगण(Nyasa Devgan) बॉलीवूडच्या स्टायलिश स्टारकिड्सपैकी एक आहे. ती नेहमीच आपले पार्टीतील फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चर्चेत असलेली पहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच तिचे स्पेन,ग्रीस मधील फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते. आणि काल-परवा पर्यंत अनेकांना संस्कारी वाटणारी न्यासा अचानक तिचा पार्टीतील बोल्ड अवतार पाहू बिघडली की काय असं वाटून गेलं. मग काय सुरु झाली सोशल मीडियावर न्यासा देवगण विरोधात टीकेची झोड. अनेकदा तशी ती ट्रोल होताना दिसते(Kajol Speaks about her daughter Nyasa Devgan Bollywood debut)

हेही वाचा: प्रसिद्ध अभिनेत्यानं खरेदी केलं जान्हवी कपूरचं घर, अभिनेत्रीनं कमावले करोडो

पण यावेळी तिची वर्णद्वेषावरनंही टीका केली गेली. तिच्या पार्टीतील त्या फोटोंवर काही ट्रोलर्सनी म्हटलं होतं,ही अचानक गोरी कशी झाली? कुणी म्हटलेलं,पार्टीसाठी खास इंजेक्शन घेऊन आली का? अर्थाते ते चुकीचच होतं यात नो डाऊट. न्यासाचे नाव सध्या तिचा मित्र वेदांत महाजन सोबत जोडले जात आहे. वेदांत हा न्यासाचा मित्र आहे. आणि त्याच्यासोबत न्यासा स्पेन,ग्रीस टूरवर गेली होती. त्यावेळी त्यांचे इतरही काही मित्र त्यांच्यासोबत होते.

हेही वाचा: Salman Khan ची कार झाली बुलेटप्रुफ, सुरक्षेच्या कारणास्तव उचललं मोठं पाऊल

आता न्यासाचे पार्टीतले व्हिडीओ फोटो व्हायरल होत असताना काजोलनं(Kajol) म्हणजे तिच्या आईनं एक मोठं वक्तव्य तिच्याविषयी केलं आहे. आता अर्थात हे गेल्या काही दिवसांपासून तिच्याविषयी ऐकायला मिळतच होतं. तर ती बातमी अशी की गेल्या काही दिवसांत न्यासा बॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय अशा बातमीनं जोर धरला होता. यावर अजय देवगण किंवा काजोल समोर येऊन याविषयी बोलले नव्हते. पण आता अभिनेत्री काजोलनं आपल्या मुलीचा बॉलीवूडमध्ये येण्यासंदर्भात काय विचार आहे यावर स्पष्टिकरण दिलं आहे.

हेही वाचा: Hollywood चा सुपरस्टार ब्रॅड पीटला वाराणसीची पडली भुरळ, म्हणाला...

काजोल म्हणाली आहे,''ती नेहमीच न्यासाला तिच्या सर्व निर्णयात पाठिंबा देईल, जेणेकरुन तिला आनंद मिळेल,तिची स्वप्न पूर्ण होतील''. काजोल पुढे म्हणाली, ''मी एक आई म्हणून कधीच माझ्या मुलीवर तिनं बॉलीवूडमध्ये यावं यासाठी जबदस्ती करणार नाही पण तिला जिथे माझं सहकार्य हवं असेल तिथे नक्कीच मी तिच्यासोबत असेन''.

हेही वाचा: Amitabh सोबत काम करायला जेव्हा संजय दत्तने दिलेला नकार, कारण सांगितलेलं...

काजोल म्हणाली, ''न्यासा तिचे निर्णय स्वतः घेते,आणि हा देखील एक महत्त्वाचा निर्णय आहे,जो तिचा तिलाच घ्यायचा आहे. मी तिने बॉलीवूडपासून लांब राहावं म्हणूनही प्रयत्न करत नाही,ना तिनं बॉलीवूडमध्ये यावं यासाठी तिच्या मागे लागते. न्यासा आता १८ वर्षांची आहे,ती आता मोठी होतेय, समजदार होतेय तेव्हा तिचा निर्णय तीच घेणार''.

Web Title: Kajol Speaks About Her Daughter Nyasa Devgans Life Important

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top