Narendra Modi : 'मोदीजी तर झोळी घेऊन निघाले, लोकही देश सोडू लागले'

मोदीजी तर झोळी घेऊन निघाले...
NARENDRA MODI
NARENDRA MODIesakal

कमाल आर खान ऊर्फ केआरकेचे भले चित्रपट अपयशी ठरत असतील, मात्र बाॅलीवूड आणि सेलिब्रिटीजपासून राजकारणावर तो नेहमी ट्विट करुन मत मांडत असतो. त्यावर चर्चाही होत असते. कोणताही मुद्दा असो त्यावर केआरके (KRK) आपली टीकात्मक प्रतिक्रिया देण्यापासून चुकत नाही. आताच आलेल्या एका अहवालानुसार ७ वर्षांमध्ये जवळपास ९ लाख लोकांनी भारत सोडून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले आहे. यावरुन केआरकेने देशाचे पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. (Kamal K Khan Attack On PM Modi For People Leaving India And Settle Abroad)

NARENDRA MODI
ग्रेट इंडियन लूट फेस्टिव्हल...प्रकाश राज यांची GST वरुन अर्थमंत्र्यांवर टीका

कमाल आर खानने ट्विट करत लिहिले, की मोदीजी सत्तेत आल्यानंतर जवळपास दहा लाख श्रीमंत भारतीयांनी आपले राष्ट्रीयत्व सोडले आहे. जवळपास ५० लाख लोक भारत सोडून परदेशात राहिला गेले आहेत. नोटाबंदी नंतर मोदीजी (Modi) म्हणाले होते, की मी तर फकीर आहे, झोळी घेऊन निघेल. श्रीमंत भारतीय म्हणाले, तुम्ही नाही जाणार सर, मात्र आम्ही जाणार !

NARENDRA MODI
Dhanush : हाॅलीवू़डमध्ये धनुषची दमदार एंट्री, देश-विदेशात होतेय कौतुक

केआरकेच्या ट्विटवर अनेक यूजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुष्मिता नावाची यूजरने केआरके टोला लगावत लिहिले, की तुम्हालाही दोन मुले आहेत. दोघेही घरातून निघाले. मात्र त्यांच्याजवळ कोणत्याही गोष्टींची कमतरता नव्हती. कदाचित तुमच्याबरोबर राहून काही तरी कमतरता त्यांना जाणवली होती. त्यामुळे त्यांनीही पलायन केले. त्यासाठी तुम्हाला दोष द्यायला हवा. दुसरा एक यूजर म्हणतो, तुम्ही हे तथ्य आकड्यांबरोबर सांगू शकता का? १९४७ मध्ये काँग्रेसच्या काळात २० लाख कुटुंबांनी भारत सोडले आणि बहुतेक उत्तर भारतातून इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निघून गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com