esakal | 'दर पंधरा वर्षांनी लग्न करतो, हे कुठलं प्रेम ?' केआरकेचा प्रश्न
sakal

बोलून बातमी शोधा

kamal khan

'दर पंधरा वर्षांनी लग्न करतो, हे कुठलं प्रेम ?' केआरकेचा प्रश्न

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (aamir khan) हा त्याच्या घटस्फोटाच्या प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. त्यानं त्याची पत्नी किरण राव (kiran rao) हिच्याशी काडीमोड घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर हा चर्चेचा मुद्दा आहे. त्यामागील कारणही त्यांनी सोशल मीडियावरुन चाहत्यांना सांगितले होते. मात्र चाहत्यांना ते कारण फारसं पटलं नाही. त्या दोघांच्या नात्याबद्दल बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. केआरके अर्थात कमाल खाननं त्यावर एक व्हिडिओ शेयर करुन प्रतिक्रिया दिली आहे. (kamal r khan video viral on aamir khan kiran rao divorce)

केआरके (kamal r khan) हा देखील गेल्या महिनाभरापासून चर्चेत आला आहे. त्यानं सलमानच्या राधे (salman khan) चित्रपटावर रिव्ह्यु केला होता. त्यावेळी सलमाननं त्याच्याविरोधात कोर्टात धाव घेतली होती. आणि कोर्टात कमाल खानच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. आता त्यानं आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोट प्रकरणावर एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

त्या व्हिडिओमध्ये कमाल खान सांगतो आहे की, आमिर खान हा वेगळ्या स्वभावाचा माणूस आहे. त्यांचा अंदाज हटके आहे. आमिरनं त्याचं आयुष्य तीन टप्यात वाटून घेतलं आहे. पहिल्या पत्नी बरोबर त्यानं 15 वर्षे संसार केला. दुसऱ्या पत्नीलाही त्यानं 15 वर्षांनंतर घटस्फोट दिला. आणि तिसरं लग्न करणार. पुढील 15 वर्षांपर्यत तो आणखी म्हातारा झाला असेल. अशा शब्दांत कमाल खाननं त्याच्यावर टीका केली आहे. त्याच्या या प्रतिक्रियेला चाहत्यांकडून तितक्याच वेगळ्या प्रकारची उत्तरं मिळताना दिसत आहे.

हेही वाचा: 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मुळे आयुष्यच बदलून गेलं - कार्तिकी गायकवाड

हेही वाचा: मुंबई दंगलीच्या वेळी दिलीप कुमार-शरद पवार भेटीचा फोटो, शबाना आझमींनी केला शेअर

कमालनं म्हटलं आहे की, आमिरनं आपल्या घटस्फोटाबद्दल जे काही सांगितलं आहे ते मला खोटं आणि नाटकी वाटतं. त्यानं सांगितलं की, गेल्या पंधरा वर्षात किरणविषयीचं माझं प्रेम आणखी वाढलं. मात्र ते खोटं आहे. जर प्रेम वाढलं असेल तर घटस्फोट देण्याची गरज काय आहे. किरण राव हिच्याविषयी प्रेम वाटत होत म्हणून तर तुम्ही त्याच्याशी लग्न केलं होतं. आता मला असे वाटते की, आमिर हा कॅटरिना किंवा फातिमा सना शेखची लग्न करेल. त्यानं तिसरं लग्न करु नये. असा माझा त्याला सल्ला आहे.

loading image