आई होणार नाही माहिती असूनही त्यानं...प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा |Kangana Lock Upp Payal Rohatagi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Poonam pandey News

आई होणार नाही माहिती असूनही त्यानं...प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Payal Rohatgi Sangram Singh Relation: अभिनेत्री कंगनाचा लॉक अप नावाचा शो सध्या भलताच चर्चेत आला आहे. त्याचे कारण त्यातील सहभागी स्पर्धकांनी केलेले धक्कादायक (Entertainment news) खुलासे. यामुळे कंगनाच्या या शो ला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद (viral news) मिळाल्याचे दिसून आले आहे. आता या शोमधून पुनम पांडे बाहेर प़़डली आहे. तिला कमी वोटिंग झाल्यानं घरी जावे लागले आहे. आपल्या आयुष्यातील धक्कादायक खुलासे करुन प्रेक्षकांचा जास्तीत जास्त प्रतिसाद मिळवणाऱ्या स्पर्धकांना कंगनाच्या शो मध्ये (Kangana Ranaut) चांगलीच लोकप्रियता मिळाल्याचे दिसून आले आहे. पायलनं आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी धक्कादायक खुलासे केले आहे. आपण आई होणार नाही हे आपल्या बॉयफ्रेंडला माहिती असूनही त्यानं आपल्याला सोडलं नाही.

सध्या पायल ही कंगनाच्या लॉक अपमध्ये प्रभावी कामगिरी करताना दिसत आहे. आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी तिनं अनेकांशी पंगा घेतला आहे. लॉक अपमध्ये पुनम पाठोपाठ सर्वाधिक लोकप्रिय असणारी स्पर्धक म्हणून पायलचे नाव घेता येईल. तिनं केलेल्या कामगिरीनं नेटकऱ्यांनी तिला सर्वाधिक वोटिंग केलं आहे. पायलनं शो मध्ये स्थान टिकवून ठेवण्यासाठी प्रेग्नंसीविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. पायलनं संग्राम सिंगसोबत लग्नाचा विचार केला असून त्यांच्या पाच वर्षे होऊनही त्यांना अपत्य न झाल्यानं अनेकांच्या शेरेबाजीला सामोरं जावं लागलं होतं. घरच्यांनी देखील त्यांना चांगलेच सुनावले होते. यासगळ्या प्रकरणावर पायलनं काही खुलासे केले आहेत. तिनं म्हटलं आहे की, माझ्या नवऱ्याला माहिती होतं की मी आई होऊ शकत नाही तरी पण त्यानं माझा कधीही दुस्वास केला नाही. त्यानं मला सोडलं नाही.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

लग्नापूर्वी अपत्य हे आम्ही मिळून ठरवलं होतं. त्यानंतर लग्न करणार होतो. मात्र अजुनही अपत्य न झाल्यानं आम्ही लग्न करणार नाही. असं पायलनं सांगितलं आहे. गेल्या पाच वर्षांपासून मी आई होण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्याला काही यश आले नाही. गेल्या काही वर्षांपासून पायल ही संग्राम सिंगला ड़ेट करत आहे. लॉकअपच्या एका शो मध्ये कंगनानं सांगितलं होतं की, आम्ही गेल्या बारा वर्शांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत. मी त्याच्याशी लग्न करण्यास उत्सुक आहे. मात्र मी आई होणार नाही हे मला माहिती झाल्यानं मी त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे पायलनं सांगितलं आहे.

हेही वाचा: Poster Viral: 'हरिओम' मधले ते दोन मावळे आहे तरी कोण?

Web Title: Kangana Lock Upp Payal Rohatgi Boyfriend Relationship Statement Never Be Mother Husband Sangram

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top