शिवम - पुनमची सगळ्यांसमोर आंघोळ, मुनवर म्हणतो, 'रमजान आहे, नाहीतर...' |Kangana Lock Upp Show Shivam Sharma | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lock upp Show News

शिवम - पुनमची सगळ्यांसमोर आंघोळ, मुनवर म्हणतो, 'रमजान आहे, नाहीतर...'

Lock upp: कंगनाचा लॉक अप शो आता शेवटच्या टप्पात आला आहे. त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या शो ने नेटकऱ्यांचे लक्ष (Bollywood Actress Kangana Ranaut) वेधून घेतलं आहे. कंगनाचा हा शो मनोरंजन विश्वात चालेल की नाही याबद्दल वेगवेगळे प्रश्न विचारले जात होते. मात्र कंगनानं लॉक अपचा (Lock Upp entertainment News) टीआपरी मोठ्या उंचीवर नेला आहे. सुरुवातीच्या काळात राखीनं (Rakhi Sawant) कंगनाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. देशातल्या मनोरंजन विश्वातील सर्वाधिक वादग्रस्त सेलिब्रेटी या शो मध्ये सहभागी झाल्या होत्या. आता शिवम शर्मा आणि पुनम पांडेनं नेटकऱ्यांना मोठा धक्काच दिला आहे. त्यांनी चक्क सगळ्यांसमोर आंघोळ करत अनेक स्पर्धकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये आतापर्यत कंगनानं सर्वाधिक वादग्रस्त शो म्हणून प्रसिद्धी मिळवली असली तरी त्यातील वेगवेगळ्या वादानं सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी पुनम पांडेच्या वादानं लॉक अप वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्याचा परिणाम लॉक अपच्या टीआरपीवर झाला होता. पुनम आणि शिवमनं जे काही केलं त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल व्हावे लागले आहे.

Lock upp Show

Lock upp Show

Lock Upp Show

Lock Upp Show

त्याचे झाले असे की, शिवमनं असा विचार केला की, आज आपण बाहेरच्या पॅसेजमध्ये आंघोळ केली तर काय प्रॉ़ब्लेम आहे, त्यामुळे तो तसे करतो. त्याच्या जोडीला पुनमही येते. तिनंही त्याठिकाणी आंघोळ करण्यास सुरुवात केली. त्यांना पाहून प्रिन्स आणि सायशा पुन्हा घरात निघुन जातात. हे सगळं पाहून मुनव्वर म्हणतो, मला बाहेर काय चालु आहे हे माहिती आहे, पण आता सध्या रमजान सुरु आहे, मी उपवास केला आहे. मला त्यांना पाहायचे नाही आणि मला त्यांचे कौतुकही करायचे नाही. अशा शब्दांत त्यानं आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Kangana Lock Upp Show Shivam Sharma Poonam Pandey Open Bath Video Viral Munwar Reaction

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top