Lock Upp: 'तू आहेस गटार' अंजलीच्या वक्तव्यावर भडकली अजमा फल्लाह

टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये कंगनाच्या लॉक अप नावाचा शो सध्या चर्चेत आला आहे.
kangana ranaut lock upp show
kangana ranaut lock upp show esakal
Updated on

Lock upp; टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये कंगनाच्या लॉक अप नावाचा शो सध्या चर्चेत आला आहे. त्यातील वादग्रस्त वक्तव्यामुळे नेटकऱ्यांचे लक्ष त्या शो कडे वेधले गेले आहे. देशातल्या (Tv Entertainment News) मनोरंजन क्षेत्रातील सर्वाधिक वादग्रस्त सेलिब्रेटींना घेऊन लॉक अप शो ची निर्मिती करणाऱ्या कंगनाच्या या शो चा टीआरपी देखील वाढला आहे. (Bollywood Actress) सुरुवातीच्या काळात लॉक अप प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार की नाही याची शंका होती. मात्र त्यातील सहभागी स्पर्धकांनी केलेल्या वक्तव्यामुळे प्रेक्षकांना बिग बॉस (Bigg Boss) सारखे मनोरंजनाचे माध्यम मिळाले आहे. आता हा शो शेवटच्या टप्यात आला असून त्यात स्पर्धक जिंकण्यासाठी एकमेकांवर वाट्टेल ते आरोप करताना दिसत आहे.

लॉक अपमध्ये असणाऱ्या अजमा फल्लाह आणि अंजली अरोडा यांच्यात तू तू मैं मैं पाहायला (Kangana Ranaut) मिळाली. हा वाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका टास्कच्या दरम्यान त्यांच्यात जोरदार भांडणं झाल्याचे दिसून आले आहे. लॉक अप हा सध्या हायव्होल्टेज ड्रामा झाला आहे. त्याच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये स्पर्धकांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडलेली नाही. यापूर्वी पुनम पांडे आणि पायल रोहतगी यांच्यात झालेल्या वादानं सोशल मीडियावर नेटकऱ्यांची झोप उडवली होती. त्यांच्या भांडणाचा व्हिडिओही व्हायरल झाल्याचे दिसून आले होते. कंगनानं त्या शो मध्ये सर्व सहभागी स्पर्धकांना एक टास्क दिला होता. त्याचे स्वरुप असे होते की, प्रत्येकानं आपण सगळ्यात इतरांपेक्षा श्रेष्ठ का आहोत हे सांगणे अपेक्षित आहे. त्या टास्कला सुरुवात झाल्यानंतर अनेकांनी एकमेकांवर खालच्या पातळीवर आरोप केले.

kangana ranaut lock upp show
Video viral: सुजल जगदाळे उर्फ बुलट कुठं बसलंय बघा! पेपर सोडून आला बैलगाडा शर्यतीत

तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्याला या शोमधून बाहेर काढण्यासाठी योग्य कारण द्यायचे आहे. हे सांगायला कंगना विसरली नाही. दरम्यान अंजली अरोडा आणि अजमा फल्लाह यांच्यात वादावादी सुरु झाली. त्याचे रुपांतर भांडणात झाले. त्यात अंजलीनं अजमाला तू गटार असून बोगस असल्याची टिप्पणी केली. अंजलीच्या त्या बोलण्यावर अजमानंही जशास तसे उत्तर दिले. मी तुझ्यापेक्षा तर चांगलीच आहे. मी कुणाच्या जवळ जाण्यासाठी काही विशेष काम तर करत नाही. सध्या त्यांच्या भांडणाचा वाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com