'खान मंडळींना शिव्या देते, त्यांच्याच ईद पार्टीला जाते!' कंगनाला झाडलं|Kangana Ranaut Entry Salman Khan Eid party | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Kangana Ranaut

'खान मंडळींना शिव्या देते, त्यांच्याच ईद पार्टीला जाते!' कंगनाला झाडलं

Bollywood News: बॉलीवूडमधील खान (bollywood celebrity) मंडळींच्या विरोधात नेहमीच कडवट प्रतिक्रिया देणारी सेलिब्रेटी म्हणून कंगनाचं (Actress Kangana Ranaut) नाव घ्यावं लागेल. तिनं आतापर्यत सलमान, शाहरुख आणि आमिर (Aamir Khan) विरोधात कायम परखड मतं व्यक्त केली आहेत. अनेकदा त्यावरुन तिला ट्रोल व्हावे लागले आहे. आपला (Bollywood Actor) रियॅलिटी शो लॉक अप सुरु होण्यापूर्वी तिनं चक्क सलमानला या शोमध्ये सहभागी होण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर राखी सावंतनं सलमानची बाजु घेत कंगनाला (entertainment news) झापले होते. हा शो किमान शंभर दिवस सुरु ठेवून दाखवावा. अशा शब्दांत राखीनं कंगनावर टीका केली होती. मात्र कंगनाच्या लॉक अपनं नेटकऱ्यांची पसंती मिळवली आहे. येत्या 7 मे रोजी या रियॅलिटी शो चा ग्रँड फिनाले आहे. त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता कंगनाचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये कंगना ही सलमान खान आणि त्याचा मेहुणा आयुष यांच्या ईद पार्टीमध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. त्यावेळी तिनं त्या पार्टीमध्ये असलेल्या फोटोग्राफर्सला वेगवेगळ्या पोझ देऊन अनेकांना धक्काही दिला आहे. सलमानच्या त्या पार्टीमध्ये बॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी सहभागी झाले होते. त्यात दीपिका पादुकोण, कियारा अडवाणी, शहनाज गिल यांच्या नावाचा समावेश आहे. शहनाजच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिनं सलमानला किस करत आपल्याला सोडून न जाण्याची विनंती त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये केल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यात चर्चेत आली आहे कंगनाची त्या पार्टीतील इंट्री. सलमानच्या पार्टीमध्ये कंगनानं सहभागी होणं हे तिच्या चाहत्यांना काही आवडलेलं नाही. त्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

सलमानच्या त्या पार्टीमध्ये सगळ्यात जास्त चर्चा ही शहनाज गिलची होती. तिनं सलमानची गळाभेट घेऊन त्याला किस केलं होतं. सलमाननं तिला पंजाबची कतरिना कैफ असं म्हटलं आहे. दुसरीकडे बॉलीवूडमधील नेपोटिझम आणि खान मंडळीवर सडकून टीका करणाऱ्या कंगनाला त्या पार्टीमध्ये पाहून अनेकांना धक्का बसला आहे. कंगना या पार्टीमध्ये कशी असा प्रश्न तिला सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांनी विचारला आहे. अनेकांनी तिच्यावर टीकाही केली आहे. एकानं तिला नेहमी मुस्लिमांवर टीका करणारी कंगना त्या पार्टीमध्ये गेलीच कशी, असा प्रश्न विचारला आहे. दुसऱ्यानं म्हटलं आहे की, आमच्यासमोर त्या अभिनेत्यांना शिव्या द्यायच्या आणि त्यांच्या पार्टीमध्ये सहभागी व्हायचे हे कंगनाला कसे जमते...अशा प्रकारचे प्रश्न कंगनाला नेटकऱ्यांनी विचारले आहेत.

हेही वाचा: Poster Viral: 'हरिओम' मधले ते दोन मावळे आहे तरी कोण?

Web Title: Kangana Ranaut Entry Salman Khan Eid Party Video Viral Social Media Users Trolled

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top