Bad Bunny News: एक्स गर्लफ्रेंडनं शिकवला धडा,बॉयफ्रेंडवर ठोकला तीनशे कोटींचा दावा! काय आहे कारण? | Entertainment News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bad Bunny

Bad Bunny: एक्स गर्लफ्रेंडनं शिकवला धडा,बॉयफ्रेंडवर ठोकला तीनशे कोटींचा दावा! काय आहे कारण?

Bad Bunny: सेलिब्रिटी म्हटलं की त्याची चर्चा असते. चाहत्यांना आपल्या लाडक्या सेलिब्रिटीच्या बाबतीत जाणुन घेण्याची उत्सुकता असतेच.

त्यातच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ते चर्चेत असतातच. मात्र काहीवेळी हे सेलिब्रिटी अनेक अडचणीतही सापडतात. असचं काहीसं एका हॉलिवूड कलाकारासोबत घडलं आहे.

हॉलिवूडमधील सेलिब्रिटी बॅड बनीचे नाव नेहमीच चर्चेत असते. जो त्याच्या रॅपसाठी खूप लोकप्रिय आहे.

नुकतीच, रॅपर बनीबद्दल एक मोठी बातमी येत आली आहे. ज्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गायक आणि रॅपर बनीवर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने खटला दाखल केला आहे.

त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात तिने आरोप केला आहे की रॅपरने तिच्या परवानगीशिवाय तिचा आवाज वापरला आहे.

विशेष म्हणजे बॅड बनीच्या गर्लफ्रेंडचे नाव कार्लिस्ले डी ला क्रूझ आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2016 मध्ये दोघांनी वेगळे केले. बऱ्याच वर्षांनंतर आता त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

कार्लिज म्हणते की, बनीने त्याची फसवणूक केली आहे आणि तिला न विचारता त्याच्या दोन गाण्यांमध्ये तिचा आवाज वापरला आहे. ही दोन्ही गाणी यूट्यूबवर चांगलीच लोकप्रिय आहेत.

'पाटी' या पहिल्या गाण्याला यूट्यूबवर 355 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर दुसरे गाणे 'डॉस मिल' 60 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. या दोन्ही गाण्यांना रसिकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बनीच्या गर्लफ्रेंडने त्याच्यावर आरोप केला आहे की त्याने ती दोन्ही गाणी रेकॉर्ड, प्रमोशन आणि ग्लोबल कॉन्सर्टसाठी वापरली.

या सगळ्यात त्याने कधीच कार्लिजची परवानगी घेतली नव्हती. एवढेच नाही तर, कार्लिजने त्याच्याकडून ४० मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ३३० कोटी रुपयांची भरपाई म्हणून मागणी केली आहे. आता या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.