
अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना रानौत यांच्यातील व्दंद्व सगळ्यांना माहीत आहे. कंगनाने हृतिकवर विविध आरोप केले आणि हृतिकनेही तिच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले.
मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे ती सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर तिने हिंदी चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीवर जोरदार हल्ला चढविला होता.
लग्न सोहळ्यांच्या नव्या नियमांसह नवे पॅकेज; कॅटरर्स व्यवसायही लागला तयारीला...
त्यानंतर हा मुद्दा हिंदी चित्रपटसृष्टीतील चर्चेचा विषय ठरला होता. आता तिने पुन्हा तोंडसुख घेतले आहे अभिनेता हृतिक रोशनवर. हृतिक भाड्याच्या घरात राहात होता आणि त्या घराचे भाडे त्याचे वडील भरत होते, असे तिने एका मुलाखतीत म्हटले आहे आणि त्यामुळे पुन्हा हृतिक आणि कंगना यांच्या वादाला नव्याने तोंड फुटले आहे.
आता फक्त अर्धा तासात होणार कोरोनाची चाचणी! बृहन्मुंबई महापालिकेने घेतला मोठा निर्णय
अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना रानौत यांच्यातील व्दंद्व सगळ्यांना माहीत आहे. कंगनाने हृतिकवर विविध आरोप केले आणि हृतिकनेही तिच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. त्यानंतर काहीसा हा वाद थंडावला होता. परंतु पुन्हा आता वादाची ठिणगी पडली आहे. कंगनाने एका ठिकाणी दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, की जेव्हा मी हृतिकबरोबर काम करीत असताना तेव्हा हृतिकने आपल्या एका मित्राला मी त्याच्या पैशाच्या मागे आहे, असे म्हटले होते. याबद्दल बोलताना आता तिने आपली सफाई दिली आहे.
ती म्हणते की, मला गर्व आहे मी मुंबईत माझे स्वतःचे घर आहे आणि स्वतःचे आलिशान ऑफिस आहे. हृतिक भाड्याच्या घरात राहतो आणि त्याचे भाडे त्याचे वडील भरतात, असे कंगनाचे म्हणणे आहे. जेव्हा आमची न्यायालयीन लढाई सुरू झाली तेव्हा काही जणांनी मी छोट्या शहरांतून आली आहे आणि हृतिकच्या पैशाच्या मागे आहे, असे म्हटले होते. त्यावेळी मी पैशाच्या मागे नाही हा मुद्दा कसा खोडून काढावा या विचारात होते. पण तेव्हा मी हादेखील विचार केला की माझे स्वतःचे घर आणि ऑफिस आहे. त्यामुळे मी अशा बाबींकडे दुर्लक्ष केले, असेही तिचे म्हणणे आहे.