...म्हणून कंगनाला आली मुंबईची आठवण

kangna
kangna

मुंबई- कंगना रनौत हे नाव गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. नेहमीच वादाचा मुकूट आपल्या डोक्यावर घेवून मिरवणारी अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. जुन्या आठवणी ताज्या करत तिला स्वप्ननगरी मुंबईची आठवण आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने हा क्षण तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

मुंबईत सकाळी घोडेस्वारीच्या आठवणींना तिने उजाळा दिला आहे. शिवाय घोडेस्वारी करतानाचे काही फोटो देखील तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत. सध्या तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये मुंबईची आठवण येत असल्याचं सांगितलं आहे. 'मला मुंबईमधील एका गोष्टीची आठवण सतत सतवत आहे ती म्हणजे घोडेस्वारी. दररोज सकाळी घोडस्वारी करण्याची मज्जा वेगळीच आहे. मला खेळामधील फार ज्ञान नाही. पण माझा घोडा माझी नेहमी साथ देतो.' असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

कंगना सध्या तिचा आगामी सिनेमा 'तेजस'च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी तिने सिनेमाचे दिग्दर्शक सर्वेश मेवाडा यांना जेवणासाठी आमंत्रित केले होते. याशिवाय सध्या तिच्या अडचणींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिची बहीण रंगोली हिला दुसरी नोटीस बजावत १० नोव्हेंबरला हजर राहण्याची ताकिद दिली आहे.  

kangana remembers riding in mumbai  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com