esakal | कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजा याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
sakal

बोलून बातमी शोधा

chiranjivi sarja

कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजा याचे बंगळूर येथे एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 39 वर्षांचे होते.

कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजा याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई ः  कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजा याचे बंगळूर येथे एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 39 वर्षांचे होते. चिरंजीवीच्या छातीत दुखू लागल्याने तसेच श्वसनास त्रास होऊ लागल्याने ताबडतोब एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराला त्याने फारसा प्रतिसाद दिला नाही.

वाचा ः शाब्बास योद्ध्यांनो... मुंबईतील पोलिसांनी केली कोरोनावर यशस्वी मात

अखेर रविवारी दुपारी त्याने अंतिम श्वास घेतला.  त्याच्या स्वॅबचा नमुना कोरोना व्हायरस तपासणीसाठी पाठविला गेला आहे. ते चित्रपट अभिनेते अर्जुन सरजा यांचे पुतणे आणि ज्येष्ठ कन्नड अभिनेते शक्ती प्रसाद यांचे नातू आहेत. सन 2018 मध्ये त्याने अभिनेत्री मेघना राजशी लग्न केले आहे.

वाचा ः मुलाचे लग्न साधेपणाने करत कोव्हिड योद्ध्याने सहकाऱ्यांसाठी केला 'हा' उपक्रम 

चिरंजीवीचा जन्म बंगळूरूमध्ये झाला होता. त्याने आपले शालेय शिक्षण बंगळूरच्या बाल्डविन बॉईज स्कूलमध्ये पूर्ण केले. बंगळूरच्या विजया कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्याने आपले काका अर्जुन सरजा यांच्याकडे जवळपास चार वर्षे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. चिरंजीवीने कन्नड चित्रपट वायुपुत्र या चित्रपटातून पदार्पण केले. तेव्हापासून त्याने 'चिररू', 'सिंहर्गा', 'अम्मा... आय लव यू' आणि 'आटगारा' यासह वीस हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा आगामी 'राजा मार्थांडा' हा चित्रपट पोस्ट-प्रॉडक्शन टप्प्यात आहे आणि आणखी तीन चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले आहे.