ज्येष्ठ अभिनेते सुपरस्टार सत्यजित काळाच्या पडद्याआड

कन्नड चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेते, सुपरस्टार सत्यजित यांचे निधन झाले.
ज्येष्ठ अभिनेते सुपरस्टार सत्यजित काळाच्या पडद्याआड

कन्नड चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेते, सुपरस्टार सत्यजित यांचे निधन झाले. वयाच्या ७२ वर्षी त्यांनी बेंगळुरूच्या बोरिंग हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. या आठवड्याच्या सुरुवातीला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते बऱ्याच काळापासून आजारांमुळे ग्रस्त होते. सत्यजीत यांनी १९८३ साली 'अल्ला नीने ईश्वर नीने' या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यांचे खरे नाव 'सय्यद निजामुद्दीन' हे होते, त्यांनी फिल्म इंडस्ट्री मध्ये आल्यानंतर स्वताःचे नाव सत्यजीत हे ठेवले. सत्यजीत यांनी अनेक उल्लेखनीय चित्रपट केले, आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले.

सत्यजीत यांची अष्टपैलु अभिनेता अशी देखिल ओळख होती. सत्यजीत य़ांनी ३० वर्षांच्या कारकिर्दी मध्ये ६० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या काही उल्लेखनीय चित्रपटांमध्ये शिव मच्छिदा कन्नप्पा, म्हैसूर जन, किलर डायरी , किंग , ग्राम देवाथे , धुम्म , आप्तमित्र , सई , नम्मा बसवा, अरासू , अर्जुन , पेपर दोनी , क्रांतिवीरा सांगोली रायन्ना , अध्याय , रन्ना , कट्टे, विराट , आणि रणथंथ्रा या चित्रपटांचा समावेश आहे.

२०१६ मध्ये मधुमेहाच्या गंभीर आजारामुळे त्यांच्या आरोग्यावर खूप परिणाम झाले आणि त्यामुळे सत्यजीत यांचा डावा पाय कापून टाकावा लागला होता. २०१८ मध्ये दिग्दर्शक विनय कृष्णाच्या अॅक्शन थ्रिलर 'सीझर'या चित्रपटात सत्यजीतसह, चिरंजीवी सर्जा, व्ही. रविचंद्रन, पारुल यादव, आणि प्रकाश राज यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. सत्यजित यांचे लग्न सोफिया बेगमशी झाले आहे आणि त्यांची मुलगी पायलट असून त्यांचा मुलगा आकाश जिथ देखील कन्नड चित्रपटसृष्टीत अभिनेता आहे.

ज्येष्ठ अभिनेते सुपरस्टार सत्यजित काळाच्या पडद्याआड
"खान आडनावामुळे आर्यन पीडित अन् सुशांत हिंदू असल्यामुळे व्यसनाधीन?"
ज्येष्ठ अभिनेते सुपरस्टार सत्यजित काळाच्या पडद्याआड
शाहरुखच्या ड्रायव्हरची 12 तास चौकशी: त्यानं कबूल की...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com