कपिल शर्मावर का आलीय पार्ट टाईम जॉब करण्याची वेळ?

सोशल मीडियावर कपिल शर्माचा एक फोटो व्हायरल झाल्यामुळे त्याचे चाहते पेचात पडले आहेत.
Kapil Sharma
Kapil SharmaGoogle

कॉमेडी किंग कपिल शर्मा (Kapil Sharma) चा एक फोटो सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. त्या फोटोत कपलिचा गेटअप पाहून सगळेच चक्रावून गेलेयत. कोणाचाच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेनासा झालाय. काय गेटअप आहे नेमका त्या फोटोत कपिलचा? या फोटोत कपिल फूड डिलिव्हरी करताना दिसत आहे. कपिल शर्माच्या एका चाहत्यानं ऑरेंज कलरच्या टी शर्टमधील कपिलचा हा फोटो शेअर केला आहे. ज्यात तो बाईकवर बसलेला दिसत आहे. आणि त्याच्या पाठी अगदी हुबेहूब जशी फूड डिलिव्हरी करणाऱ्या बाईकवर एक पेटी बसवलेली असते तशी पेटी दिसत आहे. भर रस्त्यात कपिलचा हा फोटो क्लिक करुन त्याला सोशल मीडियावर शेअर देखील केलं आणि कॅप्शन दिलं आहे की,कपिलजी, 'आज मी तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं'.

Kapil Sharma
देसी गर्ल प्रियंकाच्या अमेरिकनं सासरी अशी रंगली भारतीय होळी

कपिलने लगोलग हा फोटो आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिलं की,'' कोणाला सांगू नकोस''. आता या फोटोमागच जरा सत्य जाणून घेऊया. हा फोटो झूम केल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही की तो डिलिव्हरी बॉय खरंच कपिल आहे. पण तो हे काम का करायला लागला असा प्रश्न पडला असेल ना. सर्वप्रथम सांगतो की तो फोटोतला माणूस कपिलचं आहे. एका सिनेमासाठी त्यानं तो तसा लूक केला आहे. आणि कपिल हुबेहूब डिलिव्हरी बॉय दिसला पाहिजे यासाठी नंदिता दासनं खूप मेहनत घेतली आहे. यावर चाहत्यांनी मात्र मस्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. कुणी म्हटलं आहे,'मी फोटोत आजुबाजूच्या गाडीत कपिल बसलाय का ते पाहत होतो. पण इथे तर स्विगी वाला माणूसच कपिल निघाला'. तर दुसरा एकजण म्हणाला आहे,'सर हे काम का सुरू केलं?' तर आणखी एकजण म्हणाला,'पार्ट टाईम जॉब पकडलायस का कपिल?'.

नंदिता दास(Nandita Das)च्या सिनेमाता कपिल फूड डिलिव्हरी बॉयची भूमिका करताना दिसणार आहे. ओडिसा येथील भुवनेश्वरमध्ये तो याचं शूटिंग करत आहे. खरतर कपिलच्या खूप चाहत्यांनी आधी त्याला ओळखलंच नाही. तर अनेकांनी त्यांची फोटो पाहून खिल्लीही उडवली. कपिलने गेल्यावर्षीच या सिनेमाविषयी आपल्या चाहत्यांना सांगितलं होतं. तेव्हा त्यानं खास ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com