'क्युटनेस की दुकान'; कपिलने शेअर केला गोंडस अनायराचा फोटो 

टीम ई सकाळ
Monday, 22 February 2021

कपिलने गोंडस अनायरा सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये अनायरा कपिलच्या पोज कॉपी करत आहे.

मुंबई - आपल्या विनोदी संवाद शैलीतून कपिल शर्मा नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवतो. द कपिल शर्मा शो मधून कपिल प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. मात्र काही दिवसांपूर्वी हा शो बंद झाला. दुसऱ्यांदा बाबा झााल्याने कपिलने या शोमधून काही दिवस ब्रेक घेतला होते.

कपिलचे  2018 मध्ये  गिन्नी चतरथ सोबत लग्न झाले.  त्यानंतर 2019 मध्ये  गिन्नी आणि कपिलला मुलगी झाली. तिचं नाव अनायरा ठेवण्यात आले.  नुकताच कपिल दुसऱ्यांदा बाबा झाला. यावेळी कपिलला मुलगा झाला आहे. कपिलने ही बातमी सोशल मीडियावरून सर्वांना दिली होती. कपिल आणि त्याच्या कुटुंबाला सोशल मिडियावर सर्वांनी शुभेच्छा दिल्या. 

हे वाचा - पतौडी पॅलेस ते स्वित्झर्लंडमध्ये घर.. सैफ-करीना आहेत एवढ्या संपत्तीचे मालक

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

क्रिकेटर सुरेश रैनाने 'अभिनंदन पाजी वहिनींना आणि मुलांना स्नेह' असं ट्वीटकरून शुभेच्छा दिल्या. अभिनेता मनोज वाजपेयी, बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल या सेलिब्रिटींनी कपिल आणि गिन्नीला शुभेच्छा दिल्या.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

हे वाचा - 'मी खरंच वाईट माणूस नाही'; शर्मिष्ठाच्या पोस्टनंतर मंदार देवस्थळींचा जाहीर माफीनामा

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

नुकताच कपिलने गोंडस अनायरा सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये अनायरा कपिलच्या पोज कॉपी करत आहे. बापलेकीच्या या सुंदर फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. यामध्ये अनायरा आणि कपिलची बाँडिंग दिसत आहे. कपिल शर्मा शो मधील कलाकार शुमोना चक्रवर्तीने या फोटोला 'क्युटनेस की दुकान' अशी कमेंट केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kapil sharma share daughter anayra photo on instagram