Karan Deol Roka Ceremony : 'आलात तर थोडी घेऊन जा'!, सनीची फोटोग्राफर्सला केली 'दारुची' ऑफर

करण विषयी सांगायचे झाल्यास २०१९ मध्ये पल पल दिल के पास नावाच्या चित्रपटामध्ये दिसला होती. त्याचे दिग्दर्शन सनी देओलनं केले होते.
Karan Deol Roka Ceremony
Karan Deol Roka Ceremonyesakal

Karan Deol roka ceremony : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओल, पुजा देओल यांचा मुलगा करण देओलचा रोका समारंभ नुकताच पार पडला. यावेळी बॉलीवूडमधील दिग्गज सेलिब्रेटी हजर होते. त्याचे फोटो आणि काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. Karan Deol Roka Ceremony Sunny offer photographers

फिल्म निर्माता बिमल रॉय यांची पणती दृष्टि आचार्य सोबत लग्न करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या लग्नसोहळ्याची चर्चा आहे. सोमवारी या कपल्सचे प्री वेडिंग सेलिब्रेशन झाले. त्यालाही नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यासगळ्यात पापाराझ्झी फोटो घेण्यासाठी लगबग करत होते. ते पाहून सनीनं त्यांना जे निमंत्रण दिले त्याची चर्चा होत आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

त्या इव्हेंटचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी फोटो काढताना सनीनं पापाराझ्झींना विचारले की, काही घेतलं की नाही, त्यावर त्यानं गंमतीनं एका व्यक्तीला पापाराझ्झींसाठी मद्यपानाची व्यवस्था करा. असे सांगितले. त्यानंतर मोठा हशा पिकल्याचे दिसून आले.

करण विषयी सांगायचे झाल्यास २०१९ मध्ये पल पल दिल के पास नावाच्या चित्रपटामध्ये दिसला होती. त्याचे दिग्दर्शन सनी देओलनं केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा काही चालला नाही. त्यानंतर २०२१ मध्ये वेले मध्ये करण दिसला. त्यात त्यानं त्याचा काका अभय देओलसोबत महत्वाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. यानंतर आता अपने २ मध्ये करण अभिनय करण्यासाठी सज्ज असून त्यामध्ये सनी, बॉबी आणि धर्मेंद्र भूमिका करणार आहेत.

Karan Deol Roka Ceremony
Sunny Deol: 'अरे बाप रे सनी देओल'! नगरच्या शेतकऱ्यांने तारा सिंगला ओळखलचं नाही.. video Viral

सनी देओलच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तो लवकरच त्याच्या गदर २ नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. यापूर्वी त्याच्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्या चित्रपटामध्ये सनीनं तारा सिंहची भूमिका केली होती. जी प्रेक्षकांना कमालीची आवडली होती. यात सनीच्या जोडीला अमिषा पटेल दिसली होती. हा चित्रपट येत्या ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

Karan Deol Roka Ceremony
Shah Rukh Khan : 'आता फक्त कुत्र्यांनाच माझा चित्रपट आवडायचा राहिला बाकी!' किंग खानचा इशारा कुणाकडे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com