Karan Deol Wedding: नवरा आला वेशीपाशी! नातवाच्या वरातीत आजोबा धर्मेंद्र थिरकले, व्हिडिओ बघाच

करण देओल आता काहीच वेळात लग्न करेल. लग्नाच्या वरातीत करणचे आजोबा आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र थिरकताना दिसले.
Karan Deol Wedding Dharmendra dance at his grandson's wedding, video viral
Karan Deol Wedding Dharmendra dance at his grandson's wedding, video viralSAKAL
Updated on

Dharmendra Dance in Karan Deol Wedding: सनी देओलचा लाडका लेक करण देओलच्या लग्नाची धामधूम सध्या जोरात सुरु आहे. संपूर्ण देओल कुटुंब करणच्या लग्नात एकत्र आलंय. एकूणच देओल कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे.

सनी सुद्धा लाडका लेक करणच्या लग्नासाठी कोणतीही कसूर बाकी सोडत नाहीत. नुकताच करणच्या लग्नासंबंधी एक व्हिडिओ समोर आलाय. यात करणच्या लग्नाची वरात दिसतेय.

(Karan Deol Wedding Dharmendra dance at his grandson's wedding, video viral)

Karan Deol Wedding Dharmendra dance at his grandson's wedding, video viral
Kiran Mane: आणि आईचं स्वप्न किरण मानेंनी पूर्ण केलं.. रितेश देशमुख सोबत खास कनेक्शन

पंजाबी कुटुंब म्हटलं की प्रत्येक सण समारंभात एक सळसळता उत्साह असतो. हाच सळसळता उत्साह देओल कुटुंबात सुद्धा दिसून येतंय.

सनी देओलचा लाडका करण देओल आज 18 जूनला लग्न करणार आहे. लग्नापुर्वी करण देओल संपूर्ण कुटुंबासह घोडीवर स्वार झाला.

करणच्या लग्नाच्या वरातीचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओत सनी देओल करणचा हात धरून चालताना दिसत आहे.

याशिवाय दुसऱ्या व्हिडिओमध्ये करण देओल माता राणीच्या मंदिरात गेल्यानंतर घोडीवर बसलेला दिसत आहे. क्रीम रंगाच्या शेरवानी आणि पगडीमध्ये करण देखणा दिसतोय.

याशिवाय करणचे आजोबा धर्मेंद्र लाल पगडी आणि तपकिरी रंगाचा सूट परिधान केलेले दिसले. या मिरवणुकीत काका बॉबी आणि अभय देओल इतर सर्व कुटुंबीय सहभागी झाले आहेत.

Karan Deol Wedding Dharmendra dance at his grandson's wedding, video viral
Bigg Boss OTT: काहीच तासाच पुनीत सुपरस्टारला फेकलं घराबाहेर, केली मोठी चुक

करण देओल आता काहीच वेळात लग्न करेल. लग्नाच्या वरातीत करणचे आजोबा आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र थिरकताना दिसले. वयाची ८० ओलांडली असली तरीही धर्मेंद्र पाजींचा सळसळता उत्साह सर्वांना लाजवेल असा आहे.

संपूर्ण देओल कुटुंबाने डोक्यावर लाल रंगाची पगडी घातली आहे. धर्मेंद्र, बॉबी, अभय आणि नवऱ्याचे वडील सनी एकदम आनंदात दिसत आहेत. करणच्या लग्नासाठी संपूर्ण बॉलिवूड तारांगण अवतरणार अशी शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.