करण जोहरची पार्टी भोवली? 55 बॉलीवूड सेलिब्रेटींना कोरोनाची लागण|Karan Johar Birthday party Bollywood 55 celebrity | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karan Johar Birthday party

करण जोहरची पार्टी भोवली? 55 बॉलीवूड सेलिब्रेटींना कोरोनाची लागण

Karan Johar Birthday Party: बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा (Bollywood News) वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा कऱण्यात आला होता. यावेळी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. या पार्टीनंतर एक मोठी (Corona Virus) बातमी समोर आली आहे. ती म्हणजे बॉलीवूडच्या 55 सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाला आहे. गेल्या वर्षी देखील करण जोरहच्या घरी झालेल्या (Bollywood Celebrity) एका पार्टीमध्ये अभिनेत्री करिना कपूर, मलायका अरोराची बहिण अमृता अरोरा यांना कोरोना झाला होता. त्यानंतर मुंबई महानगर पालिकेनं (Bollywood Actor) त्यांच्यावर कारवाईचे आदेशही दिले होते. आताही करणची पार्टी त्या बॉलीवू़डच्या सेलिब्रेटींसाठी मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.

करणच्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या अनेक सेलिब्रेटींना कोरोना झाला आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. नुकताच करणनं त्याचा 50 वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता. त्या बर्थ डे पार्टीमध्ये बॉलीवूडचा भाईजान सलमान खान, विकी कौशल, कतरिना कैफ, करिना कपूर खान, पूजा हेगडे, ऋतिक रोशन, सबा आझाद, शाहरुख खान, याशिवाय टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. आता यातील नेमक्या कोणत्या सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे याची माहिती मिळाली नसून पार्टीतील 55 जणांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे दिसुन आले आहे. बरेच जण आपले नाव जाहिर केल्यास सोशल मीडियावर बदनामी होईल या भीतीनं कोरोना झाल्याचे सांगण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: Video : Kartik Aaryan ने सांगितलं त्याला कशी मुलगी हवी आहे ते

बॉलीवूड हंगामानं दिलेल्या एका बातमीनुसार, बॉलीवूड सेलिब्रेटींना करण जोहरच्या पार्टीची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होणार असल्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता करण जोहरचे सगळ्यात जवळच्या मित्रांनाच कोरोना झाला आहे. त्यात अनेकांनी कोरोना झाल्याचे अजुन सांगितलेले नाही. काल प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनला कोरोनाचा झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारला देखील कोरोना झाल्याचे त्यानं स्वता सोशल मीडियावर सांगितले होते.

हेही वाचा: Video : Coffee With सकाळमध्ये अशोकमामा स्पेशल

Web Title: Karan Johar Birthday Party Bollywood 55 Celebrity Covid Positive Social Media Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top