'Nepotism'चा टॅग आजही माझ्या मानगुटीवर, करणनं सांगितला कटू अनुभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karan Johar open up on nepotism

'Nepotism'चा टॅग आजही माझ्या मानगुटीवर, करणनं सांगितला कटू अनुभव

आलिया ते जान्हवी आणि वरूण धवन ते सिद्धार्थ मल्होत्रा या यशस्वी कलाकारांना खरी ओळख करण जोहरच्या चित्रपटातून मिळाली आहे. (Nepotizm) स्टार असो किंवा नसो उत्तम कलाकारांच्या लॉचिंगसाठी करण जोहर जबाबदार आहे असं म्हणायला हरकत नाही.तरी नेपोटिझमच्या मुद्दा बाहेर पडला की करणला जबाबदार धरल्या जातं. यावेळी त्याने यावर मोठा खुलासा केलाय.

एका मुलाखतीत याचा कटू अनुभव करणने शेअर केलाय. करण म्हणतो, "कॉफी वित करण याच शो पासून नेपोटिझमच्या विषयाला उधाण आलं होतं. त्यानंतर या विषयाला एवढी उभाळी आली की, मला लोकांनी माझ्यावर आरोप करायला कुठलीच जागा सोडली नाही. सोशल मीडियावर मला आजही मोठ्या प्रमाणावर ट्रोल केल्या जातं."

हेही वाचा: Karan Johar: कुणीही सोबती नसल्याचं करणला दु:ख, मला कुणीच सोबती नाही!

"आधी मला लोकांच्या वागण्याची, ट्रोलींगची चिड यायची. आता मात्र ते नेहमीचं झालंय. त्यामुळे मला त्याचं नवीन काही वाटत नाही. नेपोटिझम आता माझ्या आयुष्यातील एक अभिशाप बनून राहिलाय. खरं नेपोटिझम काय असतं ते लोकांना अजूनही कळत नाही." असंही करण म्हणतो. "नेपोटिझम हा विषय माझ्या मानेच्या दुखण्यासारखं झालंय." असं म्हणत करणने नेपोटिझमचा त्याचा कटू अनुभव सांगितलाय.

Web Title: Karan Johar Revealed Nepotism Refused Leave Him Still He Trolled

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top