
करण कुंद्राच्या लग्नाला घेऊन त्याच्या वडिलांचं मोठं वक्तव्य
बिग बॉस सिझन १५(Big boss 15) चे विजेतेपद तेजस्वी प्रकाशने पटकावलं आहे. बिग बॉसमध्ये तिने खेळलेले टास्क्स आणि गेम प्लॅन हे जितकं गाजलं तितकंच करण कुंद्रासोबतचं तिचं प्रेम प्रकरणही चांगलंच चर्चेत राहिलं. याच शो च्या दरम्यान करण कुंद्रा(Karan Kundra) आणि तेजस्वी प्रकाश(Tejasswi Prakash) यांच्या प्रेमाचं नातं जुळून आलं. संपूर्ण शो दरम्यान ते एकमेकांच्या सोबतच असायचे. रुसवे-फुगवे झाले तरी त्यांच्यात दुरावा मात्र आला नाही. बिग बॉस शोच्या दरम्यान या दोघांचे कुंटुंबियही एकदा आले होते. त्यांनीदेखील करण-तेजस्वीच्या नात्याला संमती दिली होती. पण आता शो संपला आहे,तेव्हा बाहेर आल्यावर या दोघांच्या लग्नाला घेऊन करण कुंद्राचे वडिल एस.पी.कुंद्रा यांनी मोठं वक्त्वय केलं आहे
हेही वाचा: कंगनानं नवाजुद्दिन सिद्दिकीचा तो फोटो पोस्ट केला अन्...
शो च्या अंतिम सोहळ्यानंतर करणच्या वडिलांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बिग बॉसच्या घरात करणने केलेल्या कामगिरीची प्रशंसा करतानाच त्याच्या तेजस्वीसोबतच्या नात्यावरही भाष्य केलं. हे बोलतानाच त्यांनी मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर थम्ब्स अप करूनही दाखवले. ते पुढे म्हणाले,''शक्य होईल तितक्या लवकर तेजस्वी-करणचं लग्न करण्याचा विचार आम्ही करीत आहोत''. त्यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. करण-तेजस्वीचे चाहतेही या व्हिडीओवर खूश झालेले दिसून येत आहेत.
हेही वाचा: ''मी जिंकू नये म्हणून प्रयत्न केले''तेजस्वी प्रकाशचा मोठा खुलासा
बिग बॉसच्या घरातच या दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली. पहिल्यांदा करणनेच तेजस्वीला तो तिला पसंद करतो असं सांगितलं. नंतर या दोघांत मैत्री झाली आणि मग तेजस्वीही करणच्या प्रेमात पडली. पण अनेकदा यांच्यात रुसवे-फुगवे झालेलेही पहायला मिळाले. त्यानंतर यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उमटलेलेही आपण पाहिलं असेल. पण वाद होऊनही करण-तेजस्वीच्या नात्यात दुरावा आला नाही. शो च्या शेवटपर्यंत दोघे एकमेकांना सपोर्ट करत राहिले. त्यांच्या चाहत्यांनी तर त्यांच्या जोडीला 'तेजरन' हे नाव दिलं अन् त्याच नावाने त्यांना ओळखले जाऊ लागले. आता करणच्या वडिलांनंतर स्वतः तेजस्वी आणि करण लग्नाविषयी काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे,
Web Title: Karan Kundras Father Speaks On Karan Kundra Nad Tejasswi Prakash Marraige Bigg Boss 15 Entertainment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..