Kareena Kapoor:मोठ्या तैमूरपेक्षा खट्याळ आहे करिनाचा धाकटा लेक,आई वर्कआऊट करताना पठ्ठ्यानं पहा काय केलं..

करिना कपूरचा धाकटा मुलगा जेह अली खानचा करिना कपूरसोबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.
Kareena Kapoor Son Jeh ali khan interrupts in actress yoga class watch cute video
Kareena Kapoor Son Jeh ali khan interrupts in actress yoga class watch cute videoEsakal

Kareena Kapoor: करिना कपूरला दोन क्यूट मुलं आहेत,ज्यांचं आतापासूनच तगडं फॅन फॉलॉइंग आहे. जिथे तिची दोन मुलं दिसतील तेव्हा कॅमेरेच नाहीत,नजराही त्यांच्यावर खिळतात. तैमूर अली खान पतौडी आणि जेह अली खान पतौडी या दोघांच्या क्यूटनेसला तोड नाही. अर्थात आता तैमूर थोडा मोठा झालाय पण त्याच्याच पावलावर पाऊल टाकत खट्याळपणा करताना धाकटा जेह दिसत आहे. जेहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. त्या व्हिडीओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.(Kareena Kapoor Son Jeh ali khan interrupts in actress yoga class watch cute video)

Kareena Kapoor Son Jeh ali khan interrupts in actress yoga class watch cute video
Bollywood: राजपाल यादव अडचणीत! 'प्रयागराज'मध्ये एका विद्यार्थ्यानं अभिनेत्याविरोधात केली तक्रार...

आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की करिना कपूर फिटनेस फ्रीक आहे. ती तिच्या घरात अनेकदा योगा करताना दिसते. अर्थात ती अनेकदा आपले वर्कआऊट व्हिडीओ शेअर करत असते. आता ज्या व्हिडीओवर लोक फिदा झालेयत तो करिनाचा व्हिडीओ तिच्या ट्रेनरने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Kareena Kapoor Son Jeh ali khan interrupts in actress yoga class watch cute video
Ved Movie Trailer: जेनेलियाचं अस्खलित मराठी अन् काळीज पिळवटून टाकणारे संवाद...'वेड'चा ट्रेलर मनाला भिडला

यामध्ये करिना योगासन करताना दिसत आहे. आणि तिथे जवळच बसलेला जेह मात्र तिच्या योगाभ्यासात बाधा आणताना दिसत आहे. करिनानं योगा करना शरीर जमिनीपासून वर नेलं की लबाड जेह रांगत रांगत तिच्या अंगाखाली जाताना दिसत आहे. करिना देखील या क्षणाला एन्जॉय करताना दिसते. आणि आपल्या मुलासोबत त्याच्याच अंदाजात खेळताना दिसत आहे.


हेही वाचा: इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

सेलिब्रिटी योगा ट्रेनर अंशुकानं ही मजेदार क्लीप शेअर करत लिहिलं आहे,''याला कॅप्शनची गरजच नाही''. यानंतर लोकांनी आता या व्हिडीओवर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एकानं जेहला 'क्यूट' म्हणून संबोधलं आहे..तर कुणी म्हटलंय, 'सगळ्याच आयांसोबत मुलं रमतात अशी खेळताना'. तर एकानं लिहिलंय,'सेलिब्रिटींची मुलं देखील आमच्याच मुलांसारखी डायपर घालून घरात फिरत असतात वाटतं'. तर जेहच्या मोठ्या आत्येनं म्हणजे सबा पतौडीनं लिहिलं आहे,'जेह जान...',जरीन खाननं देखील या व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव केला.

काही दिवस आधीच करिना कपूर,सैफ अली खान जेह आणि तैमूरला घेऊन शर्मिला टागोर यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जैसलमेर इथे गेले होते. त्यावेळी केक कटींग सेलिब्रेशनचे काही फोटो क्लीक केले होते जे सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले होते. इनाया खेमू आणि तैमूर सोबतच्या शर्मिला टागोर यांच्या फोटोला खूप सारे लाइक्सही मिळाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com