Kartik Aaryan : चित्रपटांमधील यशानंतर कार्तिक आर्यनचा भाव वाढला, म्हणाला...

भूल भुलैया २ च्या यशानंतर कार्तिक आर्यनला या वर्षातला सर्वात यशस्वी बाॅलीवूड कलाकार बनला आहे.
Kartik Aaryan
Kartik Aaryanesakal
Updated on

भूल भुलैया २ च्या यशानंतर कार्तिक आर्यनला (Kartik Aaryan) या वर्षातला सर्वात यशस्वी बाॅलीवूड कलाकार बनला आहे. चित्रपटाने जगभरात २५० कोटी रुपयांचा गल्ला जमावला. निर्मात्यांना यामुळे बराच फायदा झाला. मे-जून महिन्यात आलेल्या अनेक अहवालात म्हटले आहे, की कार्तिकने भूल भुलैया २ नंतर आपली फिस वाढवली आहे. आता तो एका चित्रपटासाठी ३५-४० कोटी रुपये फिस घेत असल्याचा दावा करण्यात आला आहे. कार्तिकने यावर थेट उत्तर दिले नाही. (Kartik Aaryan Comment On His Hiking Fees After Bhool Bhulaiyaa 2)

Kartik Aaryan
Gauri Ingawale : गौरीची मोहकता...

मात्र याच प्रकारची एक बातमी ट्विट करत त्याने लिहिले, प्रोमोशन झाले आहे, इंक्रीमेंट नव्हे. कार्तिक विषयी बोलताना भूल भुलैया २ चे निर्माता भूषण कुमार (Bhushan Kumar) म्हणाले होते, की त्याने आर्थिक बाजूंनीही चित्रपटासाठी मदत केली. चित्रपटाच्या यशाने भूषण खूपच खूश होते. त्यांनी आपल्या चित्रपटातील (Bollywood News) अभिनेता कार्तिकला जगातील सर्वात महागडी कारपैकी एक असलेल्या मॅकलाॅरेन जीटी कार भेटी दिली होती.

Kartik Aaryan
अल्लु अर्जुनचा फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, म्हणाले - 'पुष्पा २' का?

नुकसान होऊ नये

आता कार्तिक एका नव्या मुलाखतीत यशानंतर फिस वाढवल्याबद्दल सविस्तर बोलला आहे. कार्तिक म्हणाला फिस वाढवणे ही साधारण गोष्ट आहे. मात्र इतके वाढू नये की त्यावर विश्वासच बसू नये. डिजिटल आणि सॅटेलाईट हक्क एक अभिनेत्याच्या नावाने, दिग्दर्शक-निर्माता, त्यांच्या टीमच्या नावावर चित्रपट विकला जातो. जर ती किंमत जास्त मिळत आहे त्यावेळी, तर सर्वांची तितकी भाववाढ होणे साधारण आहे. जर असे होत नसेल तर त्यांनी कमीच ठेवा. जर तुम्ही चित्रपट बनवत असाल तर त्यावर दबाव आला नाही पाहिजे.

Kartik Aaryan
'तारक मेहता'तील आत्माराम भिडे भावूक; म्हणाले-दुबईतील नोकरी सोडून...

मला या गोष्टीवर विश्वास आहे. पुढे तो म्हणतो, जर चित्रपटाची कमाई अभिनेत्याच्या मागील यश, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रपटाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीच्या मागील यशाचे कारण आहे. त्यामुळे सर्वांची फिस वाढवण्यामागे वाईट काय? मात्र त्याचे वजन जेव्हा चित्रपटावर पडतो तेव्हा चुकीचे होऊन जाते. फिसबाबत बागुलबुवा करण्यात काही अर्थ नाही. कारण हे सर्वांना माहीत असते की अभिनेत्याच्या मागील यशामुळे त्याचे चित्रपट महागडे विकले गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com