कार्तिक आर्यनचं स्वप्न मोठ्ठ ! म्हणाला, आता खासगी जेटही मिळायला हवं | Kartik Aaryan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kartik Aaryan

कार्तिक आर्यनचं स्वप्न मोठ्ठ ! म्हणाला, आता खासगी जेटही मिळायला हवं

Kartik Aaryan News : कार्तिक आर्यन २०२२ मधील बाॅलीवूडचा सर्वात मोठा स्टार आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणावर बाॅलीवूड चित्रपटांना बाॅक्स ऑफिसवर शुकशुकाट पाहायला मिळाले आहे. त्यात कार्तिकने 'भूल भुलैय्या २' (Bhool Bhulaiyaa 2) सारखा हिट चित्रपट दिला आहे. मात्र या यशा व्यतिरिक्त कार्तिकच व्यक्तिमत्त्व एक आहे, ज्याचे लोक सर्वात जास्त चाहते आहे , जे रिलेटेबल आहे. त्याचा अर्थ असा की ती त्याच्याशी जोडले गेल्याची अनुभूती मिळते.

आपल्यातील एक अस लोकांना त्याच्याविषयी वाटते. नुकतेच 'द काश्मीर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कार्तिक आर्यन ( Kartik Aaryan) बरोबरचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला होता. पोस्टच्या कॅप्शनमध्ये कार्तिकचे कौतुक करत ते म्हणाले डाऊन टू अर्थ आणि मुळांशी जोडलेला तरुण अभिनेता.

हेही वाचा: 'ब्रह्मास्त्र'मध्ये शाहरुख वेगळ्या रुपात, वानर अस्त्र बनला अभिनेता

कार्तिक म्हणाला, आजही मी इकाॅनमीत (क्लास) प्रवास करतो. जेव्हा आवश्यक असेल, तेव्हा मी बिझनेसनेही प्रवास करतो. अनेक जण स्वतःला हे करण्यापासून थांबवतात. मी तसे केले नाही. माझे स्वप्न आहेत, माझी एक ड्रीम कार होती. (Bollywood News)

मला लॅम्बर्गिनी हवी होती आणि ती मला मिळाली. मला एक अभिनेता बनायचे होते. मी झालो. चित्रपट मला मिळत आहेत. स्वप्न पडतात. पुन्हा माझे स्वप्न मोठेही होऊ लागले आहेत.

हेही वाचा: Mega BlockBuster: सौरव गांगुली-रोहित शर्मा यांचे अभिनय क्षेत्रात पदार्पण..

खासगी जेटही यायला हवा. कार्तिक म्हणतो त्याला आणखी यशस्वी व्हायचे आहे. त्याला वाटते आताचे जे यश आहे, ते महायशात रुपांतरित व्हावे. मात्र याने त्याच्या व्यक्तिमत्त्वात कोणतेही बदल झाले नव्हते. आताही कुटुंबाबरोबर कुठेही खायला गेल्यावर तेच ऑर्डर असते जे पूर्वी होते.

Web Title: Kartik Aaryan Dreams Getting Bigger After Bhool Bhulaiya 2

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..