Shehzada: प्रमोशनसाठी शहजादा जीव तोडून भटकला शेवटी हॅकर्सनं घात केला! कार्तिकला मोठा झटका Kartik Aaryan Film Leaked online in HD Print and other website | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kartik Aaryan 'Shehzada'

Shehzada: प्रमोशनसाठी शहजादा जीव तोडून भटकला शेवटी हॅकर्सनं घात केला! कार्तिकला मोठा झटका

क्रिती सॅनन आणि कार्तिक आर्यन यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'शहजादा' गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कार्तिकने त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडली नाही.त्याने दिल्लीतील इंडिया गेटपासून दुबईतील बुर्ज खलिफापर्यंत सगळी कडेच चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. त्याचा 'शहजादा' हा चित्रपट आज म्हणजेच १७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. कार्तिक आर्यनचा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याचीच हवा आहे.

कार्तिक आर्यनचे चाहते या चित्रपटाचं जोरदार कौतुक करताना दिसत आहेत. एकीकडे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असतांनाच मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आर्यन आणि क्रिती सेननचा चित्रपट ऑनलाइन लीक झाला असल्याच्या बातम्या येत आहेत.

टाइम्सच्या वृत्तानुसार, कार्तिक आर्यनचा हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. 1080p, 720p, 480p, 360p, 240p आणि HD प्रिंटमध्ये Tamilrockers, Movierulz आणि Filmyzilla सारख्या साइट्सद्वारे हा चित्रपट लीक झाला आहे. आता निर्माते यावर काय कृती करतात हे पाहावे लागेल. मात्र असं झाल्याने या चित्रपटाला कोटींचा फटका बसू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कार्तिक आर्यन चित्रपटात मुख्य अभिनेता असून त्याने निर्माता म्हणूनही या चित्रपटाद्वारे पदार्पण केले आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कार्तिकनं कसलीच कसर सोडलेली नाही. कार्तिक आणि क्रिती सेनॉन व्यतिरिक्त या चित्रपटात मनीषा कोईराला, परेश रावल, रोनित रॉय आणि सचिन खेडेकर दिसणार आहेत. रोहित धवन दिग्दर्शित या चित्रपटाला प्रीतमने संगीत दिले आहे.