Ananya-Aditya Affair: सिद्धार्थ-कियारानंतर आदित्य अन् अनन्याचा नंबर..करण जोहरनंच ..

Bollywood Love Affairs: बॉलिवूडमध्ये सध्या लगीन घाई सुरु आहे. तर कीहींच्या अफेअरच्या चर्चाही जोरात सुरु आहे.
Ananya Pandey Aditya Roy Kapoor affair
Ananya Pandey Aditya Roy Kapoor affairEsakal
Updated on

Ananya Pandey Aditya Roy Kapoor affair: बॉलिवूडमध्ये सध्या लगीन घाई सुरु आहे. तर कीहींच्या अफेअरच्या चर्चाही जोरात सुरु आहे. त्यात भुमी असो किंवा तमन्ना या अभिनेत्रींही चर्चेत आहेत. आता यातच बी-टाऊनमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्यात ही काहीतरी शिजत असल्याच्या बातम्या जोर धरु लागल्या आहेत.

नुकतचं सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर दिसले होते आणि ते दोघे एकत्र पार्टीत पोहोचले होते. तेव्हापासून ही बातमी चर्चेत आली.

आता अनन्याने आदित्य रॉय कपूरच्या 'द नाईट मॅनेजर' या वेबसिरीजच्या प्रीमियरलाही हजेरी लावली होती. आता त्यातच करण जोहरनेही या दोघांच्या नात्याबद्दल एक इशारा दिला आहे.

Ananya Pandey Aditya Roy Kapoor affair
Urfi Javed: 'विचार काय हाय तुमचा...' उर्फीनं व्हिडिओ शेअर करत दिलं व्हॅलेंटाईनचं भन्नाट गिफ्ट
Ananya Pandey Aditya Roy Kapoor affair
Milind Gawali : 'महाराष्ट्र मराठी माणसांचा पण सिनेमांचा नाही', मिलिंद गवळी असं का म्हणाले?पोस्ट चर्चेत

करण जोहरने 'कॉफी विथ करण' शोमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरच्या अफेअरबद्दल हिंट दिली होती. करणच्या या शोमध्ये त्याने अनेक जोडींच्या केमेस्ट्रीबद्दल बोललं आहे आणि त्या जोड्या नंतर लग्न बंधनात अडकल्या आहेत.

माझ्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत मी अनन्या आणि आदित्य यांच्यातील उत्तम केमिस्ट्री पाहिली, असं करणनं सांगितलं होतं. यानंतर जुलै 2022 मध्ये अनन्या आणि आदित्यच्या अफेअरची बातमी समोर आली होती. कॉफी विथ करणमध्ये अनन्यानेच आदित्य रॉय कपूरला हॉट म्हटले आहे.

त्यानंतर पुन्हा आदित्य आणि अनन्या दोघही मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत एकत्र दिसले. ब्लॅक आउटफिटमध्ये दोघेही खूपच आकर्षक दिसत होते.

डिसेंबर 2022 मध्येही दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघेही एकत्र 'फिफा वर्ल्ड कप 2022' पाहण्यासाठी कतारला पोहोचले होते.

Ananya Pandey Aditya Roy Kapoor affair
Swara Bhaskar Wedding: भाऊ भाऊ म्हणाली कोर्टात जाऊन त्याच्याशीच लग्न करून आली! स्वरा तुला मानलं...

आता पुन्हा अनन्या आणि आदित्य रॉय कपूर चर्चेत आले जेव्हा दोघांनी सिड-कियाराच्या रिसेप्शनमध्ये एकत्र पोज दिली. अनन्याने काळ्या रंगाची साडी नेसली होती, तर आदित्य काळ्या रंगाच्या सूटमध्ये ट्यूनिंग केली होती.

दोघांची जोडी खूप छान दिसत होती. आता अनन्या-आदित्य हे बॉलिवूडचे पुढचं जोडपं मानलं जात आहे. त्याच बरोबर दोघांचे चाहतेही या जोडीला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com