कार्तिक आर्यनने लालबागच्या राजाचे घेतले दर्शन, चाहत्यांबरोबर काढले फोटो

अभिनेता कार्तिक आर्यनने लालबागच्या राजाचे घेतले दर्शन
Kartik Aaryan And Lal Bagcha Raja
Kartik Aaryan And Lal Bagcha Raja esakal

Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थीच्या निमित्त बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या आई-वडिलांसोबत मुंबईतील लालबागच्या राजाच्या दरबारात पोहोचला. कार्तिक गणपतीचे आशीर्वाद घेतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्याने लालबागच्या राजाची पूजा करून त्याच्या चरणी नारळ अर्पण केले. येथे कार्तिक आर्यनला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. (Karthik Aaryan Take Lal Bacha Raja Darshan)

Kartik Aaryan And Lal Bagcha Raja
Ganesh Chaturthi : अमृतासाठी गणेशोत्सव आहे खास, बनवली बालगणेशाची मूर्ती

कार्तिक आर्यनने आई-वडिलांसोबत फोटो काढले आणि त्याचे आराध्य दैवत गणेशाच्या मूर्तीसमोर फोटोशूटही केले. या खास प्रसंगी कार्तिक आर्यनने बेबी पिंक कलरचा कुर्ता आणि पांढरा पायजमा परिधान केला होता. (Ganesh Chaturthi News)

Kartik Aaryan And Lal Bagcha Raja
धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड

कार्तिकने चाहत्यांची घेतली भेट

घरी निघताना कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) त्याच्या चाहते आणि लहान मुलांसोबत फोटोही काढले. त्याने लोकांना हात जोडून अभिवादन केले. आम्ही तुम्हाला सांगतो की कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैय्या २' हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता आणि अलीकडेच त्याचा एक तरुण चाहता त्याला रूह बाबाच्या वेशात भेटायला आला होता. (Bollywood News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com