'तो' म्हणतोय, जाह्नवी कपूरसारख्या हुशार मुलीने माझा टी-शर्ट घातला तर...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 June 2020

जाह्नवी आणि कार्तिक ''दोस्ताना 2'' या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. लॉकडाउन होण्यापूर्वी दोघांनीही चित्रपटासाठी शूट केले होते.

मुंबई - कार्तिक आर्यनचे नाव आतापर्यंत अनन्या पांडेचे, सारा अली खानशी जोडलेले होते पण काही दिवसांपासून त्याचे नाव जाह्नवी कपूरशीही जोडले जात आहे. अलीकडेच एका मुलाखतीत कार्तिकला विचारले गेले की, त्याच्या आणि जाह्नवी कपूरच्या लिंकअपच्या बातम्यां विषयी चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे, यावर कार्तिक म्हणाला, "जर जाह्नवी कपूरसारख्या हुशार मुलीने माझा टी-शर्ट घातला असेल तर मग मी खूप आनंदी होईन''.

जाह्नवी आणि कार्तिक ''दोस्ताना 2'' या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. लॉकडाउन होण्यापूर्वी दोघांनीही चित्रपटासाठी शूट केले होते.

या मुलाखती दरम्यान कार्तिकला विचारलं होतं की, त्याला कोणत्या प्रकारच्या मुलीशी लग्न करायला आवडेल ? तर कार्तिक म्हणाला, 'मला दीपिका पादुकोण सारख्या मुलीशी लग्न करण्याची ईच्छा आहे.'कार्तिक याचे कारण सांगते, 'दीपिकाला तिच्या पतीचा अभिमान आहे. ही खूप छान गोष्ट आहे. दीपिका हि विविध मुलाखती आणि सोशल मिडियावर रणवीर सिंगचे कौतुक करताना दिसते.

वाचा - सैफ अली खान झोपेत असताना तैमूर बघा काय करतो ?

कार्तिक आर्यन - कियारा अडवाणीच्या 'भूल भुलैया 2' चित्रपटाचे शूटिंग सध्या तरी लांबणीवर

'भूल भुलैया 2' चे निर्माते मुराद खैतानी पिंकविला बरोबर बोलताना म्हणाले की, नुकत्याच झालेल्या चित्रपटाचे चित्रीकरण करणे कठीण आहे. मुरादच्या म्हणण्या नुसार 'अद्याप चित्रपटाच्या शुटिंगची कोणतीही योजना नाही. चित्रपटाशी संबंधित सर्व लोक समान संपर्कात असून प्रत्येकाच्या सूचनेनुसार अशा कोरोनाच्या भितीदायक परिस्थितीत कोणतेही शूटिंग करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रत्येक जण प्रथम सुरक्षित राहण्याविषयी आणि चांगल्या काळाची वाट पाहत आहे. म्हणून  लॉकडाउन असताना शूट करणे शक्य नाही.

मुंबईमध्ये शूटिंग सुरू करु

मुराद पुढे म्हणाले की, 'चित्रपटाचा प्रमुख भाग लखनौमध्ये चित्रीत होणार आहे, म्हणून तो एक नवीन मार्ग शोधत आहे. त्यांच्या मते आम्ही कोरोना उद्रेक होण्यापूर्वी लखनौमध्ये शूटिंग करत होतो पण तिथे परत जाणे सुरक्षित नाही. हेच कारण आहे की सर्वात आधी मुंबईमध्ये शूटिंग सुरू करून नंतर मग सुरक्षित ठिकाण पाहून बाकीचं शूटिंग करूयात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kartik aaryan talk about link up rumours with janhvi kapoor