Kasba Bypoll Result 2023 : 'माझा पायगुण म्हणून कसब्यात भाजपचा पराभव! बिचुकले बोलले

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून अभिजित बिचुकले यांनी कसबा मतदार संघात झालेल्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे.
abhijeet bichukale
abhijeet bichukale Sakal

Kasba Bypoll Result 2023 : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून अभिजित बिचुकले यांनी कसबा मतदार संघात झालेल्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याची चर्चा होताना दिसत आहे. बिचुकलेंना ४७ मतं मिळाली आहेत. त्याची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

बिचुकले म्हणाले, मी मतदारांचे मनापासून आभार मानतो. मला एक गोष्ट सांगायची आहे, राजकारणातील सहकारी देवेंद्र फडणवीस यांचा मोठा पराजय आहे. माझा पायगुण असा की, पहिली निवडणूक कसब्यात लढलो आणि त्याचा फायदा कॉग्रेसला झाला. यासारखी आनंदाची गोष्ट नाही. माझ्या नावाची चर्चा झाली ही देखील मोठी गोष्ट आहे. यावेळी बिचुकलेनं सातारच्या लोकसभा निवडणूकीचा दाखला दिला.

Also Read - बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पराभव करण्यासाठी पवार साहेब मैदानात उतरले होते. हे आपण सगळ्यांनी पाहिले आहे. कसब्यामध्ये देखील चुरशीची लढत होती. मी देखील उदयनराजे यांच्या विरोधात उभा राहिलो होतो तेव्हा देखील माझा पायगुण म्हणून ते जिंकले. आदित्य ठाकरेच्या विरोधात देखील मी उभा होतो. यात देखील माझा वाटा आहे. अशी प्रतिक्रिया बिचुकलेनं दिली आहे.

मी कुणाला कशाचेही आमिष दाखवले नाही. बिचुकले कुठेही चुकले नाही. जनता चुकली हे मला सांगायचे आहे. लोकशाहीचा आधारस्तंभ जनता आहे. त्यामुळे ती कधी काय विचार करेल हे मला सांगता येत नाही. मी काही कसब्याचा रहिवाशी नाही. पण निवडणूकीच्या दरम्यान तिथे राहायला होतो. सध्या सोशल मीडियावर बिचुकलेची प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

abhijeet bichukale
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: सलमान खानचे 'बिल्ली बिल्ली' गाणे रिलीज, शहनाज गिल आणि पलक तिवारीचा दिसला अनोखा अंदाज

कसबा पोटनिवडणुकीत उमेदवार अभिजीत बिचुकले यांना ४७ मतं मिळाली आणि त्यांचं डिपॉजिट जप्त झालं. यानंतर बिचुकले यांनी प्रतिक्रिया देताना पराभव मान्य असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर आपण आता लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहिर केलं. दरम्यान, कसब्यात माझ्यापेक्षा मोठी हार माझ्या मित्राची झाली, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून त्यांनी म्हटलं आहे.

abhijeet bichukale
Akshay Kumar: नरेंद्र मोदींना 'तो' प्रश्न विचारून ट्रोल झाला होता अक्षय..आता म्हणतोय,'मला PMO ऑफिसमधूनच..'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com