शूटींगआधी कतरिना कैफने केली कोरोना टेस्ट, सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

katrina
katrina

मुंबई- कतरिना कैफ पुन्हा एकदा कामावर परतली आहे. मात्र शुटिंग सुरु झालं असलं तरी सेटवर खबरदारी घेतली जातेय. अभिनेत्री कतरिना कैफने नुकतंच तिच्या टीमसोबत मालदीवमध्ये शूटिंग सुरु केलं आहे. यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ तिने चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. मात्र शूटींग सुरु करण्याआधी कतरिना कैफने कोरोना टेस्ट केली आहे. त्याचा व्हिडिओ देखील तिने शेअर केला आहे. 

कतरिना कैफने व्हिडिओ शेअर करत लिहिलंय, हे केलं पाहिजे. शूटिंगसाठी टेस्ट. (डॅनीकडून अत्यावश्यक मेसेज 'नेहमी हसत राहा') व्हिडिओमध्ये दिसून येतंय की टेस्ट करत असलेल्या मेडिकल प्रोफेशनलने पीपीई किट घातलं आहे आणि खबरदारी घेत आहेत. कतरिना कैफने तिच्या करिअरमध्ये खूप चढउतार पाहिले आहेत. एका मुलाखती दरम्यान तिने सांगितलं होतं की रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती खूप दुःखात होती.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती खूप मजबुत झाली. कतरिनाने हे देखील सांगितलं होतं की ब्रेकअपनंतरही ते दोघं एकमेकांचा आदर करतात. कतरिना कैफची खूप जास्त फॅन फॉलोईंग आहे. सो शळ मिडियावर खूप चाहते आहेत ते तिच्यावर प्रेम करतात. कतरिना नेहमी सोशल मिडियावर ऍक्टीव्ह असते आणि अनेक फोटो शेअर करत असते. कतरिनाचा हा व्हिडिओ पाहुन कोरोना टेस्ट करतानाचा होणारा त्रास सगळ्यांना दिसतोय मात्र तिने हसत हसत केलेल्या या टेस्टचं कौतुक होतंय.  

katrina kaif corona test before shooting video went viral on social media  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com