Katrina Kaif: 'विकी सोबत वेळच मिळत नाहीये', काय झालं कतरिनाला?

बॉलीवूडचे सर्वाधिक चर्चेतील कपल्स म्हणून विकी आणि कतरिनाचे नाव घेतले जाते.
Katrina Kaif And Vikcy Kaushal
Katrina Kaif And Vikcy Kaushalesakal

Katrina And Vicky Kaushal: बॉलीवूडचे सर्वाधिक चर्चेतील कपल्स म्हणून विकी आणि कतरिनाचे नाव घेतले जाते. या जोडप्याच्या लवस्टोरीची चर्चा होती. त्यांच्या लग्नाविषयी चर्चा होती. आणि आता त्यांच्या पहिल्या करवा चौथची चर्चा आहे. कतरिनाचा पहिला करवा चौथ आहे. त्याचीही सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये गॉसिप रंगताना दिसतंय. त्यातच कतरिनाचा फोन भूत नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यासगळ्यात कतरिनाच्या एका वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कतरिना ही फोन भूतच्या प्रमोशनमध्ये आली असताना तिला पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. त्यात एक प्रश्न असा होता की, लग्नानंतर तुझ्या आयुष्यात काय बदल झाले? यावर कतरिनानं दिलेल्या उत्तरानं चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिनं सांगितलं आहे की, लग्न हा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात मोठा बदल घेऊन येतो. त्याचे कितीही नाही म्हटलं तरी आपल्यावर वेगवेगळे परिणामही होत असतात. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत तुमचं आयुष्य वाटून घेत असता. आता मला माझ्या विकीला वेळ देता येत नाही. आम्ही खूप प्रवास करतो, एकत्र फिरतो, मौज करतो पण बराचकाळ शुटींगच्या निमित्तानं आम्हाला बाहेरच राहावं लागतं.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे वेगवेगळे टप्पे येतात. मात्र आपण त्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. असे मला वाटते. जेणेकरुन आपल्याला आनंद वाटून घेता येईल. जर तुम्हाला तुमच्या व्यस्त वेळापत्रकामुळे एकमेकांना कमी वेळ देता येत असेल तर जेव्हा असेल तेव्हा जास्तीत जास्त वेळ एकत्रित व्यतीत करायला हवा. तुमच्या धकाधकीच्या आयुष्यात आता वेळ मिळणे अवघड आहे. अशावेळी वेळेचे नियोजन महत्वाचे आहे. असे मला वाटते. असे कतरिना म्हणते.

Katrina Kaif And Vikcy Kaushal
Double XL Trailer: 'मुलांना ब्रा मोठी हवी पण कंबर बारीक'!

कतरिनाच्या फोन भूत चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स करुन कतरिनावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. फोन भूत हा एक हॉरर कॉमेडी असून त्यात सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Katrina Kaif And Vikcy Kaushal
Viral Video: चक्क हत्ती खातोय ठेल्यावर पाणीपुरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com