KBC 14 : नवरात्रीत खेळाचे नियम बदलले; महिलांना मिळणार विशेष सवलत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kaun Banega Crorepati News

KBC 14 : नवरात्रीत खेळाचे नियम बदलले; महिलांना मिळणार विशेष सवलत

Kaun Banega Crorepati News सोमवारी कौन बनेगा करोडपती १४च्या (KBC) एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला की, नवरात्री स्पेशल एपिसोड खूप खास असणार आहे. ‘नवरात्री दरम्यान देशातील ९ विविध राज्यांमधून ९ अतिशय खास महिलांना आमंत्रित करण्यात येईल. या महिला कौन बनेगा करोडपती १४ च्या मंचावर येतील आणि मनोरंजक खेळ खेळतील’ असे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सांगितले. म्हणजेच नवरात्रीमध्ये फास्टेस्ट फिंगर फर्स्टमध्ये फक्त महिलांनाच संधी देण्यात येणार आहे.

अमिताभ बच्चन यांनी महिलांना स्टेजवर बोलावून सर्वांची ओळख करून दिली. परिचयानंतर फास्टेस्ट फिंगर फर्स्ट ठकलेली व मध्य प्रदेशातून आलेली राणी पाटीदार हॉटसीटवर बसली. अमिताभ बच्चन यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान राणीने सांगितले की, तिचे राज्य ३S साठी प्रसिद्ध आहे. ते म्हणजे ‘सेव, साडी आणि सोना’

हेही वाचा: Gauri Khan : ‘हव्या तितक्या मुलींना डेट कर, पण...’ सुहानानंतर गौरीचा आर्यनला सल्ला

यानंतर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी राणी पाटीदारसोबत कौन बनेगा करोडपतीचा खेळ सुरू केला. राणी अतिशय हुशारीने प्रश्नांची उत्तरे देत पुढे गेली. २० हजाराच्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर हूटर वाजल्याने राणी पाटीदार यांना थांबावे लागले. अमिताभ बच्चन यांनी दुसऱ्या दिवशी भेटण्याचे आश्वासन देऊन सेट सोडला.

कौन बनेगा करोडपतीमध्ये (Kaun Banega Crorepati) काही नियम आधीच बदलण्यात आले आहेत. फास्टेस्ट फिंगर फर्स्टमध्ये पूर्वी फक्त एकच प्रश्न विचारला जायचा आणि सर्वांत जलद उत्तर देणाऱ्या स्पर्धकाला संधी मिळायची. आता अमिताभ तीन प्रश्न विचारतात आणि त्यानंतर कोणत्या स्पर्धकाने सर्वांत वेगवान उत्तरे दिली याची सरासरी काढली जाते. यानंतर हॉटसीटवर बसण्याची संधी दिली जाते.