Kavita Chaudhary Death : 'उडान' फेम अभिनेत्री कविता चौधरीचं निधन, ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

उडान या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून कविताची (Kavita Chaudhary Death) वेगळी ओळख होती.
Kavita Chaudhary Udaan Fame Actress
Kavita Chaudhary Udaan Fame Actress

Kavita Chaudhary Died : टीव्ही मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. उडान मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री कविता चौधरीचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. उडान मालिकेमध्ये तिनं आयपीएस महिला अधिकाऱ्याची भूमिका पार पाडली होती. त्यात तिनं केलेल्या कल्याणी सिंहच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ६७ वर्षीय कविताचं निधन हदयविकाराच्या (Udaan Fame Actress Kavita Chaudhary Died) धक्क्यानं झालं आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये तिचे सहकारी असलेल्या अनंग देसाई यांनी ही माहिती दिली आहे. एबीपीनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. काल रात्री कविता यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Kavita Chaudhary Udaan Fame Actress
Esha Deol Divorce : का झाला 'ईशा' अन् 'भरत'चा घटस्फोट?

कविताचा भाचा अजयनं याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, (kavita latest news) गेल्या तीन ते चार दिवसांपासून कविता ही एका रुग्णालयात दाखल होती. काल रात्री साडेआठच्या सुमारास तिचं निधन झालं.तिच्या जाण्यानं टीव्ही मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. तिच्या निधनाचे वृत्त कळताच मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केला आहे.

उडान या मालिकेतून कवितानं तिची वेगळी ओळख चाहत्यांमध्ये निर्माण केली होती. सोशल मीडियावर तिचा चाहतावर्ग मोठा आहे.गेल्या काही दिवसांपासून कविता ही आजारानं त्रस्त असल्याचे दिसून आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com