KBC14: नाद नाय करायचा! कोल्हापुरच्या कविता चावला ठरल्या पहिल्या करोडपती..

'कोन बनेगा करोडपती'च्या 14 व्या पर्वात 1 कोटी रक्कम जिंकणाऱ्या कविता पहिल्या ठरल्या.
KBC 14: Amitabh Bachchan’s show got the first crorepati, Kolhapur’s Kavita Chawla won one crore
KBC 14: Amitabh Bachchan’s show got the first crorepati, Kolhapur’s Kavita Chawla won one croresakal

Kaun Banega Crorepati 14 : 'कौन बनेगा करोडपती १४' सुरू होऊन आता काही दिवस झाले असून दिवसेंदिवस कार्यक्रम अधिकच रंगत आहे. प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची प्रचंड लोकप्रियता आहे. या शो चे सूत्रसंचालन करणारे अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यामुळे खरी रंगत येत असते. हा शो सुरू होऊन जवळपास 40 दिवस होऊन गेले तरी अद्याप या पर्वाला करोडपती होणारा स्पर्धक मिळाला नव्हता. 1 करोड ही रक्कम आजवर कुणीही जिंकू शकलं नाही. पण अखेर तो क्षणही आला. कोल्हापूरच्या 'कविता चावला' या kbc 14 च्या पहिल्या करोडपती ठरल्या आहेत. (KBC 14: Amitabh Bachchan’s show got the first crorepati, Kolhapur’s Kavita Chawla won one crore)

सध्या सोशल मिडियावर याच बातमीची चर्चा आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरात राहणाऱ्या 45 वार्षिय कविता चावला यांनी कौन बनेगा करोडपतीच्या 14 व्या सीजनमध्ये एक कोटी रुपये जिंकले आहेत. या सीझनमध्ये 1 कोटी कमावणाऱ्या त्या पहिल्या स्पर्धक ठरल्या आहेत. याआधीही कविता यांनी 'कौन बनेगा करोड' पतीमध्ये सहभाग नोंदवला होता. मात्र त्या हॉटसीटपर्यंत पोहोचू शकल्या नव्हत्या. पण हार न मानता पुन्हा जुद्दीने शोमध्ये परतल्या आणि जिंकल्या सुद्धा.

आता कविता 7 कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. परंतु त्या विषयी अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. कविता आपल्या मुलासोबत म्हणजे विवेकसोबत शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. येत्या सोमवार आणि मंगळवारी हा भाग सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक हा भाग पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्सुक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com