KBC 14: हॉट सीटवरच यशस्वीला कोसळलं रडू, पुढे जे घडलं ते फक्त अमिताभच करू शकतात Amitabh Bachchan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KBC 14: Contestant Yashasvi Saxena gets emotional seeing Amitabh Bachchan

KBC 14: हॉट सीटवरच यशस्वीला कोसळलं रडू, पुढे जे घडलं ते फक्त अमिताभच करू शकतात

KBC 14: महानायक अमिताभ बच्चन(Amiyabh Bachchan) यांच्या लोकप्रिय कौन बनेगा करोडपती या शो नं छोट्या पडद्यावर एन्ट्री केली आहे. 'kBC 14' मध्ये एकापेक्षा एक तगडे स्पर्धक येताना दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या एका भागात सॉफ्टवेअर इंजिनिअर यशस्वी सक्सेना(Yashasvi Saxena) हॉट सीटवर बसली अन् तिचं आयुष्यातलं मोठं स्वप्न पूर्ण झालं. ती जशी अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर(Hot Seat) बसली तेव्हा ती स्वतःच्या भावना थांबवू शकली नाही,ती प्रचंड भावूक झाली आणि अक्षरशः रडायला लागली. तेव्हा स्वतः अमिताभ यांनी तिला सांभाळलं. चक्क तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसले. वा,काय लकी आहे. पण हे फक्त अमिताभच करू शकतात. बिग बी यांचे हे वागणे चाहत्यांच्या मनाला स्पर्शून गेले आहे. सर्वांनीच अमिताभ यांची तोंडभरून प्रशंसा केली आहे.(KBC 14: Contestant Yashasvi Saxena gets emotional seeing Amitabh Bachchan)

हेही वाचा: Laal Singh Chaddha: 9 व्या दिवशी आमिरने गमावले १०० करोड,मग कमावले किती?वाचा

'कौन बनेगा करोडपती 14' मध्ये यशस्वी सक्सेनानं सगळ्यात जलदगतीनं उत्तर देट हॉट सीटवर बसण्याचा मान पटकावला. ती जशी अमिताभ यांच्यासमोर हॉट सीटवर बसली तशी रडायलाच लागली, तिलाच तिच्या भावूक भावना आवरता येईनात. हे पाहून अमिताभ बच्चन यांनी सीटवरनं उठत तिचे अश्रू पुसले. बिग बी यांना पाहिल्यावर खरंतर यशस्वीच्या आनंदाला पारावर उरला नव्हता,ती खूपच उत्साहित झाली अन् मग अश्रूंचा बांध फूटला.

हेही वाचा: '1 करोड भरा नाहीतर...'; रणबीरच्या शमशेराला ओटीटी रिलीजसाठी हायकोर्टाचा दणका

यशस्वी सक्सेनाने या खेळाची सुरुवात उत्तम केली, तिनं सलग दोन प्रश्नांची उत्तरं बरोबर दिल्यानंतर ती तिसऱ्या ३००० च्या प्रश्नावर अडखळली. तिनं प्रेक्षकांची मदत घेणारी ऑडियन्स पोल लाइफलाइन वापरली. त्यानंतरचा पुढचा प्रश्न व्हिडीओशी संबंधित होता. ज्यामध्ये 'कल हो ना हो' सिनेमाचे गाणे वाजवले गेले. हा व्हिडीओ पाहून यशस्वीला सांगायचे होते की गाण्यातील अभिनेता कोणत्या शहरात आगे. यशस्वीनं याचं उत्तर देत ५००० रुपये कमावले.

हेही वाचा: भारतीय रेल्वेची करिनानं उडवली खिल्ली, ऐकून भडकले लोक; म्हणाले,'ही किती...'

यशस्वी सक्सेना या खेळात ८०००० च्या प्रश्नापर्यंत पोहोचली. यावेळी तिला प्रश्न विचारला गेला की असं कोणतं राज्य आहे ज्याची सीमा नेपाळशी जोडली जात नाही. या प्रश्नाचं तिनं चुकीचं उत्तर दिलं आणि फक्त १०००० रुपये ती जिंकू शकली,आणि यासोबतच तिचा केबीसी सोबतचा प्रवास थांबला.