kedar shinde post on shaheer sable birth anniversary baipan bhaari deva maharashtra shaheer
kedar shinde post on shaheer sable birth anniversary baipan bhaari deva maharashtra shaheer SAKAL

Kedar Shinde: शासनाने तुमची दखल गांभीर्याने घेतली नाही, शाहीर साबळेंच्या जन्मदिनी केदार शिंदेंनी व्यक्त केली खंत

शाहीर साबळेंच्या जन्मदिनी केदार शिंदेंनी मनातली खंत मांडणारी पोस्ट शेअर केलीय

केदार शिंदे हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक - निर्माते - अभिनेते. केदार शिंदे यांनी २०२३ मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेले दोन सिनेमे महाराष्ट्राच्या भेटीला आले.

केदार शिंदेंनी दिग्दर्शित केलेले महाराष्ट्र शाहीर आणि बाईपण भारी देवा हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा केदार शिंदेंचे आजोबा शाहीर साबळेंच्या आयुष्यावर आधारीत आहे. आज शाहीर साबळेंचा जन्मदिवस. यानिमित्ताने केदार शिंदेंनी मनातली खंत व्यक्त केलंय.

(kedar shinde post on shaheer sable birth anniversary)

kedar shinde post on shaheer sable birth anniversary baipan bhaari deva maharashtra shaheer
Gadar 2 Success Party: जे कोणाला नाही जमलं ते सनी पाजीने करुन दाखवलं, गदर 2 च्या सक्केस पार्टीला शाहरुख - आमिर - सलमान एकत्र

आज शाहीर साबळेंचा जन्मदिन त्यानिमित्ताने...

केदार शिंदेंनी आजोबा शाहीर साबळेंच्या जन्मदिनी पोस्ट लिहिलीय की, बाबा.. शाहीर साबळे.. ३ सप्टेंबर हा तुमचा जन्मदिवस. आज जन्मशताब्दी वर्षाची सांगता होईल. मी २०१९ मध्ये जे ठरवलं ते स्वामी कृपेने पुर्ण झालं. तुमच्या आयुष्याचं documentation झालं. प्राईम व्हिडीओला आज "महाराष्ट्र शाहीर" सिनेमा उपलब्ध आहे. पुढच्या कित्येक पिढ्या तुम्हाला विसरणार नाहीत याची खबरदारी घेतली आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, संजय छाब्रिया, अंकुश चौधरी यांच्या मदतीने हे शक्य झालं.

आपल्या आजोबांनी काय केलं? त्यांच्यासाठी...

केदार शिंदे पुढे मनातली खंत मांडताना लिहितात, "शासनाने तुमची दखल गांभीर्याने घेतली नाही याचं शल्य आयुष्यभर मनात राहील. पण कुणावर का अवलंबून रहायचं? याची शिकवण याच काळात मिळाली. मी पुढे दिग्दर्शक म्हणून कसा आहे?? हे सांगणं मला अवघड असलं तरी, मी शाहीरांचा नातु म्हणून कसा आहे? याविषयी लोकं भरभरून बोलतील याची खात्री आहे.. माझ्या आजोबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? यासाठी एक सिनेमा पाहिला तरी समजून येईल.. माझी नातवंड जेव्हा विचार करतील की, आपल्या आजोबांनी काय केलं? त्यांच्यासाठी बस्स एक तुमचा सिनेमा पाहिला तरी खुप झालं!!!"

केदार शिंदेंचे २०२३ मध्ये भारी सिनेमे

केदार शिंदेंनी या वर्षात दोन दर्जेदार सिनेमे दिले. एक म्हणजे महाराष्ट्र शाहीर दुसरा म्हणजे बाईपण भारी देवा. यापैकी महाराष्ट्र शाहीरला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पण बाईपण भारी देवा सिनेमाने मात्र बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई केलीय. इतकंच नव्हे तर बाईपण भारी देवा सिनेमाने सिनेमागृहात ५० दिवस पूर्ण केले असुन ७६ कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय. केदार शिंदे लवकरच बाईपण भारी देवाचा सिक्वेल आणणार अशी चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com