पुढे खूप मोठा प्रवास बाकी आहे... असं का म्हणाले केदार शिंदे.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kedar shinde shared video of new marathi movie maharashtra shahir location in wai

पुढे खूप मोठा प्रवास बाकी आहे... असं का म्हणाले केदार शिंदे..

Entertainment news : दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) यांनी आजवर रंगभूमीवर भरीव योगदान दिले आहे. त्यांची नाटकं असो किंवा चित्रपट प्रेक्षक भान हरपून त्यात समरस होतो. आजोबा शाहीर साबळे यांच्याकडून आलेला लोककलेचा वारसाही त्यांनी जपला आहे. शाहीर साबळे यांचे जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' (maharashtra shahir) हा त्यांचा चित्रपट लवकरच प्रेक्षक भेटीला येणार आहे. केदार शिंदेंकडे अनुभवांचा खजीना आहे. त्यांच्याशी गप्पा करताना ते अनेक किस्से रंगवत असतात. लोककला, नाटक, चित्रपट आणि मैत्रीचे त्यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. सध्या ते 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाच्या तयारीला लागले असून लवकरच चित्रीकरण सुरू होणार आहे. त्याचीच झलक म्हणजे ही पोस्ट..

(kedar shinde shared vedio of new marathi movie maharashtra shahir location in wai)

(kedar shinde shared post of maharashtra shahir movie location in wai)

हेही वाचा: हात नका जोडू, आपण मित्र आहोत.. मंगेश देसाईने सांगितले पडद्यामागचे शिंदे..

शाहीर साबळे यांचे सातारा जिल्हयाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते स्वतः वाई तालुक्याचेच असल्याने त्यांचे बालपण आणि पुढे बराचसा काळ हा साताऱ्यातच गेला आहे. लवकरच त्यांच्या जीवनावर त्यांचा नातू केदार शिंदे चित्रपट करत आहे. त्यासाठी लोकेशन ही महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच शोधत दिग्दर्शक केदार शिंदे संपूर्ण टीम घेऊन सातारा जिल्ह्यात गेले होते. यावेळी त्यांनी अनेक ठिकाणं लोकेशनसाठी पाहिली. त्यातली काही ठिकाणं अंतिम केली. त्यांनी शेयर केलेल्या विडिओ मध्ये साताऱ्यातील वाई तालुक्यात चित्रकरण होणार असे दिसते आहे. तसा विडिओ केदार शिंदे यांनी शेयर केला आहे. याला एक सुंदर कॅप्शनही त्यांनी दिले आहे. (new marathi movie shahir sable)

'कुठल्याही सिनेमात पडद्यावर कलाकार जितका महत्वाचा रोल प्ले करतो तितकाच महत्वाचा भाग शुटिंगसाठी निवडण्यात येणाऱ्या लोकेशनचा असतो.. ते सुद्धा सिनेमाचं एक पात्रच असतं.. आणि त्यात ही महाराष्ट्र शाहीर सारखा पिरियड सिनेमा असेल तर लोकेशन निवडीचे निकष अधिकच कठीण होतात.. त्या काळातली स्थापत्य रचना.. रंगसंगती.. रस्त्यांची रचना.. घरांच्या बांधकामाची पद्धत.. अशा अनेक परीक्षा मधून जाऊन लोकेशन योग्य की अयोग्य हे ठरतं..' असं केदार म्हणतात.

पुढे ते लिहितात, 'गेले तीन दिवस महाराष्ट्र शाहीर ची टीम ह्याच कामात व्यस्त होती.. सातारा आणि आसपासच्या भागातील अनेक सुंदर लोकेशन फिरून, निवडून, खूप भटकून, डोंगर दऱ्या चढून उतरून आम्ही जेव्हा हे तीन दिवस पूर्ण केले तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं.. महाराष्ट्र शाहीर च्या घडणीतला हा एक महत्त्वाचा टप्पा.. अजून पुढे खूप मोठा प्रवास बाकी आहे.. काही प्रवास हे मुक्कामाइतकेच सुंदर असतात!!' असे केदार यांनी म्हंटले आहे.

Web Title: Kedar Shinde Shared Video Of Maharashtra Shahir Movie Location In Wai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..