Director Prakash Koleri Death : साऊथच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन, घरातच सापडला मृतदेह

साऊथ चित्रपट विश्वातील दिग्दर्शक कोलेरी (Director Prakash Koleri Death) यांच्या जाण्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Kerala Film Director Prakash Koleri Death
Kerala Film Director Prakash Koleri Deathesakal

Kerala Film Director Prakash Koleri Death : साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश कोलेरी (Prakash Koleri) यांच्याविषयीची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांचे निधन झाले असून घरातच त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांच्या निधनानं चाहत्यांना मोठा धक्का बसला असून टॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्यावर शोक व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून साऊथ इंडस्ट्रीतून सेलिब्रेटींच्या निधनाच्या बातम्या समोर येत आहे. त्यात प्रकाश कोलेरी यांच्या बातमीनं साऊथ फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध गायिका मलिका राजपूत यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर आता ६५ (Prakash Koleri Age) वर्षीय दिग्दर्शक प्रकाश कोलेरी यांच्या निधनानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. रिपब्लिक वर्ल्डनं याबाबत वृत्त दिलं आहे.

प्रकाशजी हे त्यांच्या घरी एकटेच राहत होते. त्यांच्या चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास त्यांनी ‘मिजियिथलिल कन्नीरुमयी’ (१९८७) या चित्रपटापासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्या चित्रपटाला जाणकारांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. २०१३ मध्ये आलेला ‘पट्टुपुष्ठकम’ हा शेवटचा चित्रपट होता.

Kerala Film Director Prakash Koleri Death
Aditya Narayan Controversy : आदित्यनं रागात चाहत्याला माईक का फेकून मारला? मॅनेजरनं केला धक्कादायक खुलासा

प्रकाश यांनी त्यांच्या करिअरमध्ये ‘अवन आनंदपद्मनाभन’, ‘वरुम वराथिरिक्किला’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश यांच्याशी कोणताही संपर्क होत नव्हता. ज्यावेळी त्यांचे नातेवाईक प्रकाश यांच्या घरी गेले तेव्हा त्यांना ते घरातच मृतावस्थेत आढळले.

प्रकाश यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्रकाश हे साऊथ चित्रपट विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. मात्र ते त्यांच्या शेवटच्या चित्रपटापासून काहीसे अलिप्त राहू लागले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com