KGF 2: चित्रपट पाहिल्यावर अंगात शिरला 'रॉकी भाई' थिएटरमध्ये तोडफोड

यशच्या केजीएफ चॅप्टर 2 चा जलवा जोरात सुरु आहे. या (Tollywod Movie) चित्रपटानं बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांना धक्का दिला आहे.
kgf movie news
kgf movie newsesakal

KGF 2 Movie: यशच्या केजीएफ चॅप्टर 2 चा जलवा जोरात सुरु आहे. या (Tollywod Movie) चित्रपटानं बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांना धक्का दिला आहे. त्याच्या धाकानं बॉलीवूडमधील मोठमोठ्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी आपल्या (Entertainment News) चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा बदलल्या आहेत. गेल्या चार वर्षांपासून प्रेक्षक केजीएफच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत होते. त्यांना (Bollywood News) बराचकाळ रॉकीची प्रतिक्षा करावी लागली. आता हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित होताच त्याला प्रेक्षकांचा मोठा (Gujrat Vadodara Theatre News) प्रतिसाद मिळाला आहे. थिएटरमध्ये प्रेक्षकांची मोठी दाद केजीएफला मिळताना दिसत आहे. मात्र काही ठिकाणी केजीएफला गालबोट लागले आहे. वडोदऱ्यामध्ये या चित्रपटाचे स्क्रिनिंग सुरु असताना एक गंभीर प्रकार घड़ल्याचे दिसून आले आहे.

केजीएफ पाहताना काही प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करत थिएटरमध्ये तोडफोड केल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटकही केली आहे. त्यांच्याकडे पुढील तपासही सुरु करण्यात आला आहे. हा प्रकार सोशल मीडियावर देखील मोठया प्रमाणात व्हायरल झाला आहे. काहींनी या प्रेक्षकांना गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामध्ये केजीएफमधील रॉकी भाई पाहून त्या हल्लेखोर प्रेक्षकांना चांगलंच अवसान आल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे. गुजरात मधील वडोदऱ्यातील एका थिएटरमध्ये हा प्रकार घडल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्या हल्लेखोर प्रेक्षकांनी थिएटरमधील थ्री डी स्क्रिनची तोडफोड केली आहे. एवढेच नाही तर थिएटरमध्ये तिकिट तपासणाऱ्याला देखील मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांनी त्या प्रेक्षकांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर चार जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे.

kgf movie news
KGF 2 Song Viral: यशचा 'सुलतान' अवतार नेटकऱ्यांना भावला, सोशल मीडियावर चर्चा

एका इंग्रजी वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, थिएटरचे कॅशियर निमेश कडकिया यांनी त्या चार प्रेक्षकांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. तक्रारदारानं सांगितल्यानुसार, त्या चार प्रेक्षकांनी सीट्सवर ताबा मिळवत दादागिरी सुरु केली. त्यांना त्यांच्या तिकिटावर नमुद केलेल्या सीटसवर बसण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र त्यांनी त्याला नकार देत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर रागाला जाऊन त्या तिकिट तपासणाऱ्याला मारहाण करत शिवीगाळ केल्याचे तक्ररीत नमुद करण्यात आले आहे.

kgf movie news
Video Viral: असशील 'KGF2' चा मोठा स्टार बरं मग?, यशनं मागितली माफी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com