esakal | KGF Chapter 2 च्या रिलीजचे सिक्रेट काय?
sakal

बोलून बातमी शोधा

kgf 2 movie

KGF Chapter 2 च्या रिलीजचे सिक्रेट काय?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाचा मोठा परिणाम हा चित्रपट क्षेत्रावर झाला आहे. त्यामुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शन रखडले आहे. प्रेक्षक त्यांच्या आवडीच्या अभिनेत्याचा एखादा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची वाट पाहत आहेत. केजीएफचा (kgf chapter 2 ) पहिला भाग प्रदर्शित होऊन दोन वर्षे होऊन गेले आहेत. अजूनही त्याचा दुसरा भाग अद्याप प्रदर्शित झालेला नाही. यापूर्वी अनेकदा या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याच्या प्रदर्शनाविषयी सांगितले होते. आताही तो प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटगृह बंद आहेत. (kgf chapter 2 maker shared a photos revealing many hidden things about story )

अनेक चित्रपटांचे (corona pandemic condition) चित्रिकरण (stop shooting) कोरोनाच्या वाढणा-या प्रभावामुळे बंद आहे. त्याचाही परिणाम चित्रपटांच्या प्रदर्शनावर झाला आहे. त्यामुळे या चित्रपटांच्या निर्मात्यांपुढे मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. अजून पोस्ट प्रॉ़डक्शनचे काम न झाल्यानं त्यांना नाईलजानं प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागत आहे. मात्र प्रेक्षकांमध्ये केजीएफ २ विषयी आता वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चां रंगताना दिसत आहे. त्याचे नेमकं कारण काय याविषयी निर्मात्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली आहेत.

केजीएफच्या दुस-या भागामध्ये बॉलीवूड अभिनेता संजय दत्त (sanjau dutt), रविना टंडन(raveena tondon) , केजीएफ स्टार यश (yash) यांची भूमिका आहे. गेल्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले होते. मात्र कोरोनाचे कारण सांगून त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. आता निर्मात्यांनी सांगितले आहे की, केजीएफमधील कलाकार राव रमेश याच्या जन्मदिनाच्या दिवशी केजीएफमधील त्याचा पहिला लूक प्रदर्शित केला गेला. येत्या 16 जुलैला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा: 'राणादा'ने का घेतली आशुतोष गोवारीकरांची भेट?

हेही वाचा: Shruti Haasan : 'बरं झालं आईबाबांनी घटस्फोट घेतला'

मात्र जी तारीख निर्मात्यांनी सांगितली आहे त्यात त्यांनी वर्षाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे पुन्हा प्रेक्षकांचा गोंधळ होण्याची शक्यता अधिक आहे. जर कोरोनाची स्थिती अशीच राहिली तर 2022 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.