esakal | 'बिग बॉस'नंतर राहुल वैद्यने वाढवली फी; 'खतरों के खिलाडी'साठी घेतोय इतकं मानधन

बोलून बातमी शोधा

Rahul Vaidya
'बिग बॉस'नंतर राहुल वैद्यने वाढवली फी; 'खतरों के खिलाडी'साठी घेतोय इतकं मानधन
sakal_logo
By
स्वाती वेमूल

छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त आणि तितकाच चर्चेत राहणारा 'बिग बॉस' Bigg Boss या रिअॅलिटी शोचा चौदावा सिझन काही ठराविक स्पर्धकांमुळे विशेष चर्चेत राहिला. त्यापैकीच एकच स्पर्धक म्हणजे गायक राहुल वैद्य Rahul Vaidya. बिग बॉसमुळे राहुल वैद्यचा फॅन फॉलोईंग वाढला आहे आणि याचमुळे त्याने स्वत:चं मानधनसुद्धा वाढवलं आहे. बिग बॉसनंतर आता राहुल 'खतरों के खिलाडी' khatron ke khiladi 11 या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेणार असून यासाठी त्याने इतर स्पर्धकांपेक्षा जास्त मानधन घेतलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राहुलला एका एपिसोडसाठी जवळपास १२ ते १५ लाख रुपये मानधन दिलं जाईल.

राहुल आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा परमार या दोघांना 'नच बलिए' या डान्स रिअॅलिटी शोचीही ऑफर देण्यात आली आहे. मात्र राहुलने या ऑफरला नकार दिला. दिशा आणि राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. 'बिग बॉस'मध्ये असताना राहुलने दिशाला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. आता 'खतरों के खिलाडी'मध्ये राहुलसोबत वरुण सूद, सनाया इरानी, अर्जुन बिजलानी, दिव्यांका त्रिपाठी, अभिनव शुक्ला हे टिव्ही सेलिब्रिटीसुद्धा भाग घेणार आहेत.

हेही वाचा : दुसरं लग्न करणार का? मयुरी देशमुखचं विचारपूर्वक उत्तर

यंदाचा 'खतरों के खिलाडी' हा शो केपटाऊनमध्ये शूट होणार आहे. ६ मे रोजी सर्व स्पर्धक केपटाऊनसाठी रवाना होतील आणि महिनाभर तिथेच राहतील. या शोची शूटिंग एप्रिलमध्ये सुरु होणार होती. मात्र कोरोनामुळे शूटिंग पुढे ढकलण्यात आली आहे.

यंदाच्या सिझनचं सूत्रसंचालन दिग्दर्शक रोहित शेट्टी करणार आहे. गेल्या काही सिझनचंही सूत्रसंचालन रोहितनेच केलं होतं. जून किंवा जुलैच्या अखेरपर्यंत हा शो प्रेक्षकांना पाहता येणार आहे.