ऐकावे ते नवलच..! अक्षयकुमारने चक्क सकाळी सहा वाजता केलं तरी काय? 

Akshay-Kumar
Akshay-Kumar

मुंबई: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार  बॉलिवूडमध्ये आपल्या फिटनेससाठी ओळखला जातो. तो त्याच्या फिटनेसमध्ये कोणतीही हयगय करत नाही. सुरुवातीपासूनच अक्षयने पहाटे चार वाजता उठून कामाला सुरवात करण्याचे जे रूटीन तयार कले आहे ते आता लॉकडाऊनमध्येही कायम आहे. देशभरात सध्या सगळच बदल आहे. परंतु अक्षयचे रूटीन मात्र तसंच आहे. सकाळी चार वाजता उठून योगा आणि व्यायाम करणे. त्यानंतर सहा वाजल्यापासून आपल्या कामाला लागणं हे त्याचं रूटीन आजही सुरू आहे. विशेष म्हणजे अक्षयने आज सकाळी सहा वाजता त्याच्या 'बेल बॉटम' चित्रपटाची स्क्रिप्ट मीटिंग ठेवली होती. 

अक्षय आगामी 'बेल बॉटम' चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये चित्रपटसृष्टी बंद असताना अक्षयने या चित्रपटाची फायनल स्क्रिप्ट वाचण्यासाठी सकाळी सहा वाजता ही मीटिंग घेतली आहे. या मीटिंगमध्ये 'बेल बॉटम' चित्रपटाशी जोडले गेले सर्वच उपस्थित होते. या मीटिंगमध्ये या चित्रपटाची फायनल स्क्रिप्ट वाचण्यात आली. या मीटिंगबद्दलची माहिती दिग्दर्शक-निर्माते निखिल अडवाणी यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर या व्हिडिओ कॉलिंग मीटिंगचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत निखिलने लिहिले की,'अक्षय कुमारसाठी काहीही बदलेले नाही. लॉकडाऊनमध्ये सकाळी सहा वाजता 'बेल बॉटम' चित्रपटाची फायनल स्क्रिप्ट मीटिंग.' या फोटोमध्ये अक्षयसोबत निर्माते वासू भगनानी, जॅकी भगनानी, निखिल अडवाणी, दिग्दर्शक रणजीत तिवारी, लेखक असीम अरोरा हे दिसून येत आहेत. 

हा फोटो जॅकी भगनानीने देखील त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले आहे की,' माझी परफेक्ट सकाळ. सकाळी सहा वाजता अक्षय सरांनी आयोजित केलेली ही मीटिंग फार छान फार पडली. रणजीत सर आणि असीम सर स्क्रिप्ट खूप छान आहे. या चित्रपटासाठीआपण सर्व तयार आहोत निखिल सर. मी कधीही एवढ्या सकाळी कोणतीही मीटिंग केली नव्हती.' 'बेल बॉटम' हा चित्रपटाचे चित्रीकरण येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार होते. मात्र आता कोरोनामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होईल की नाही यावर शंका आहे. चित्रपटाचे चित्रीकरण वेगवेगळ्या लोकेशन्सवर चित्रित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com