Don 3: डॉन-3 मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री; रणवीर सिंहनं शेअर केला खास व्हिडीओ

शाहरुख खानच्या डॉन या चित्रपटात प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि करिना कपूर (Kareena Kapoor Khan) यांनी भूमिका साकारली आहे. डॉन-3 (Don 3) आता बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.
don 3
don 3

Don 3: अभिनेता रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) डॉन-3 (Don 3) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामध्ये आता बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. रणवीर सिंहनं एक खास व्हिडीओ शेअर करुन याबाबत घोषणा केली आहे. 2006 मध्ये रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) डॉन या चित्रपटात प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि करिना कपूर (Kareena Kapoor Khan) यांनी भूमिका साकारली आहे. आता डॉन-3 या चित्रपटात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कियारा आडवाणीची (Kiara Advani) एन्ट्री झाली आहे.

रणवीरनं शेअर केला व्हिडीओ

रणवीर आणि फरहान अख्तर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन कियाराचं डॉन युनिव्हर्समध्ये स्वागत केलं आहे. व्हिडीओमध्ये डॉन-3 चित्रपटाचा लोगो दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पाहा व्हिडीओ:

कियारानं शेअर केली पोस्ट

कियारानं देखील डॉन-3 या चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, "आयकॉनिक डॉन फ्रँचायझीचा भाग होण्याचा आणि या टीममध्ये करण्याचा काम करण्याचा आनंद होत आहे. आम्ही एकत्र या रोमांचक प्रवासाला निघालो आहोत, तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा."

don 3
Don 3: रणवीर सिंगच्या 'डॉन 3' मध्ये हा लोकप्रिय अभिनेता होणार खलनायक? सर्वांना उत्सुकता

2006 मध्ये शाहरुख खानचा डॉन हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात अर्जुन रामपाल, करिना कपूर आणि प्रियांका चोप्रा यांनी हजेरी लावली होती. 2011 मध्ये डॉन-2 हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात देखील शाहरुखनं प्रमुख भूमिका साकारली. आता प्रेक्षक डॉन- 3 या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. डॉन-3 या चित्रपटाची रिलीज डेट अजून जहीर करण्यात आलेली नाही.

कियारा आणि रणवीरचे चित्रपट

कियारा आणि रणवीर हे डॉन-3 या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. कियाराचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला होता तर रणवीरचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता डॉन-3 या चित्रपटात शाहरुख आणि कियारा यांची जोडी पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com